- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि.12: नवीन शैक्षणिक धोरण सर्वसामान्य, गरीब, तसेच बहुजनांच्या विरोधातील व त्यांना संपवणारे कटकारस्थान असून या कट कारस्थानच्या विरोधात मी जनतेच्या सोबत असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी केले.
शिक्षण नीती आंदोलन समन्वय समिती. अकोलाच्या वतीने रविवारी 'नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण' विषयावर जनतेशी संवाद या राज्यव्यापी कार्यशाळेचे उदघाटन भाषण करताना आमदार सरनाईक बोलत होते.
उस्मान आझाद उर्दू हायस्कूल व के .एम . असगर हुसेन शिक्षण महाविद्यालय येथे या राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम मुंडे अध्यक्ष सत्यशोधक शिक्षण सभा महाराष्ट्र, स्वागताअध्यक्ष माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन होते. विजय कौशल, इसाक सय्यद राही, संयोजक सुरज मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळा सकाळी अकरा वाजता सुरू होऊन पाच वाजेपर्यंत चालली. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले .गटचर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हे धोरण उपस्थितांनी समजून घेतले. नवीन शिक्षण धोरणावर पुढील ॲक्शन प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे उपस्थित सर्वानुमते कार्यशाळेत निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद इंगळे यांनी केले. आभार समाजसेवक गजानन हरणे यांनी मानले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा