Lina Shegokar wins Zilla Parishad by-election: जिल्हा परिषदेच्या हातरुण पोटनिवडणूकीत लिना शेगोकार विजयी;पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी होती लढत, विजयानंतर VBA ची पहिली प्रतिक्रिया…





नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्हा परिषदेच्या हातरुण पोटनिवडणूकीत कोण विजयी होईल,याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिवसेना आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत लागली होती. अखेर आज सकाळी या निवडणुकीचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी जाहीर केला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार लिना सुभाष शेगोकार (मु.कवठा पो. बहादुरा ता. बाळापूर जि. अकोला) भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. लिना शेगोकार यांनी 1641 मतांनी शिवसेना उमेदवार अश्विनी गवई यांना पराभूत केले आहे.


जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी रविवारी मतदान झाले होते. 



हातरूण सर्कलच्या पोट निवडणुकीत सात जणांचे अर्ज वैध ठरले होते. दोघांनी अर्ज मागे घेतले होते. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार यांना 4301 मते मिळाली तर शिवसेनेच्या अश्विनी गवई यांना 2660 मते मिळाली, भाजपाच्या राधिका पाटेकर यांना 2091 मते मिळाली. काँग्रेसच्या रशिका इंगळे यांना 362 मते मिळाली अपक्ष अनिता भटकर 39 मते मिळाली. 




जि. प. संख्याबळ


जिल्हा परिषदेतील संख्याबळ वंचित 25, शिवसेना 13, भाजप 05, काँग्रेस- 04, राकाँ - 04, प्रहार- 01 आणि दोन अपक्ष, असे पक्षीय बलाबल झाले आहे. 




विजयानंतरची वांचितची पहिली प्रतिक्रिया


अकोला पॅटर्नने दिला सेना - राष्ट्रवादी- प्रहार, भाजप आणि काँग्रेसला हादरा, हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर विजयी.


"एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोट निवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर मतांनी विजयी झाल्या आहेत. यासाठी राबलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागील निवडणूक मध्ये सेनेने 98 मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी खेचून आणली. विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव या मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता. भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता. एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती. पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी लढत होती. वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार या पाच पक्षांनी छुपी युती करून सेना आणि नाही जमले तर भाजप कडे मते वळवून वंचितच्या उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता. मात्र  यावेळी बाळासाहेब अतिशय दक्ष होते. वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली. सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचार ह्यातून पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली. अकोल्यातील वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मापदंड सेट केला आहे की, एक दिलाने लढले की पाच सहा कितीही राजकीय पक्ष विरोधात असू द्या वंचित विजयी होतेच. आता पुढील पोट निवडणूक लागणार आहे, व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर निकाल असाच एकतर्फी आणि वंचितच्या बाजूने असेल ह्यात तिळमात्र शंका नाही."


राजेंद्र पातोडे

प्रदेश महासचिव

वंचित बहूजन युवा आघाडी

महाराष्ट्र प्रदेश


टिप्पण्या