- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: कुरणखेड येथील मालाणी जिनिंग अँड फॅक्टरीला आज सकाळी आग लागली असून, आगीत करोडो रुपयाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुरणखेड येथील जिनिंग फॅक्टरीला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यामध्ये जिनिंग फॅक्टरीचे अंदाजे दीड कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही फॅक्टरी दीपक मलानी, धनराज मालानी, हरीश मालानी यांच्या मालकीची असल्याचे कळते.
आग आटोक्यात आणण्यासाठी कुरणखेड येथील श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक व मुर्तिजापूर नगर परिषद अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा