Indian railways vidarbha yatri sangh: कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या कधी सुरू होणार - विदर्भ यात्री संघाचा सवाल

                    संग्रहित/प्रतिकात्मक छायाचित्र

 




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या एल टी टी हावडा शालीमार एक्सप्रेस व अन्य नियमित गाड्या पुन्हा सुरू कराव्या, अश्या मागणीचे निवेदन विदर्भ यात्री संघाने रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव ,रेल्वे राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोष, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ विनय कुमार त्रिपाठी व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांच्या कडे पाठविले आहे.



यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली 18029/18030 एलटीटी हावडा शालिमार एक्सप्रेस ,22885/22886 एलटीटी टाटानगर अंत्योदय एक्सप्रेस ,11405/11406 अमरावती पुणे देवी द्वीसाप्ताहिक एक्सप्रेस ,12159/12160 अमरावती जबलपुर एक्सप्रेस, 22127/22128 एल टी टी काझीपेठ आनंदवन एक्सप्रेस,12119/12120 अमरावती अजनी इंटरसिटी एक्सप्रेस ,51197/51198 भुसावळ वर्धा पॅसेंजर ,51285/51286 भुसावळ नागपूर पॅसेंजर इत्यादी. सध्या सुरु असलेल्या नियमित प्रवासी गाड्यांमध्ये आरक्षणा करता मोठी प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट प्रत्येक गाडीमध्ये आहे. 

या सर्व नियमित गाड्या त्वरित सुरू कराव्या ,असा आग्रह केला आहे.




सध्या या गाड्या बंद असल्यामुळे रोज येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत त्रास होत आहे. विद्यार्थी ,लघु व्यवसाय इ ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या, ज्यांना बसचा प्रवास असहनीय असा वर्ग इत्यादी या सर्वांनी या गाड्या बंद असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे  व काही नियमित गाड्यांचे फेरे सुद्धा वाढविण्यात आलेले नाही ते सुद्धा वाढविण्यात यावे .रेल्वे मंत्रालय आमची ही मागणी त्वरित पूर्ण करेल, अशी आशा संघाचे अध्यक्ष डॉ. रवि के आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप  मनवानी, एड. मिश्रा, डॉ गद्रे, डॉ कुलकर्णी, मास्तर लव, वेदांत, श्रीराम अग्रवाल गुरुजी, अभि. खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या