Akola Railway Police: अकोला लोहमार्ग पोलिसांनी दिला माणुसकीचा परिचय …




अकोला: आपल्या कुटुंबीया पासून हरविलेल्या दोन आजोबांना अकोला लोहमार्ग पोलिसांनी  सुखरुप त्यांच्या नातेवाईकांपर्यन्त पोहचवून माणुसकीचा परिचय दिला.



सादत सरकार (वय ७५ वर्षे, पश्चिम बंगाल) हे दि. १४/०६/२०२२ रोजी त्यांचा मुलगा अरविंद सरकार याच्यासह कामाख्या एक्स्प्रेसने पश्चिम बंगाल येथे जात असताना रात्री १०.०० वाजता अकोला रेल्वे स्टेशन येथे अचानक ट्रेनमधून खाली उतरले. त्यांचा मुलगा अरविंद यांना अकोला रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळाने माहीती मिळाल्याने तसेच सदर ट्रेन ही नागपूर येथे थांबत असल्याने त्यांनी नागपूर येथून परत येवून दिलेल्या खबरीवरून मनुष्य मिसींग रजि. नंबर ०५/२०२२ दि. १५ / ०६ / २०२२ रोजी दाखल करण्यात आले.


यातील मिसींग इसम हे वयोवृध्द असून त्यांना कॅन्सर हा आजार असल्याने त्यांचा २ दिवस सलग अकोला रेल्वे स्टेशन व शहर परिसरात कसून शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत. दरम्यान काल दि. १७/०६/२०२२ रोजी ते अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये बसलेले असून नागपूरच्या पुढे निघाले असल्याची माहीती मिळाली. त्यावरून गोंदीया रेल्वे पोलीस स्टेशन येथे माहीती देवून त्यांना रात्री गोंदीया येथे उतरून घेण्यात आले आहे. व आज दि. १८/०६/२०२२ रोजी पो. हवा. ७६ अन्सार खान यांनी त्यांचा मुलगा अरविंद सरकार यांच्यासह गोंदीया येथे जावून मिसींग व्यक्तीस सुखरूप त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिलेले आहे.


सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस अधिक्षक श्री एम. राज कुमार सो,  अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली शिंदे , तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी, सहा. पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे व तपास पथकाने केलेली आहे.



तसेच आज दि. १८/०६/२०२२ रोजी दुपारी १२.३० वाजताचे सुमारास अकोला रेल्वे स्टेशन येथे एक वयोवृध्द इसम एकटेच रडत बसलेले दिसल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करता ते पांडूरंग देवळे एवढेच बोलत होते. त्यांच्याकडे असलेल्या साहीत्याची पाहणी करता त्यामध्ये एका फाटलेल्या चिठ्ठीवर वाशिम येथील मनोरुग्ण हॉस्पीटलचे नाव दिसले. त्यावरून संपर्क करून माहीती घेवून सदर इसमाचे नातेवाईकांचा शोध घेतला. सदर वयोवृद्ध इसम यांचे नाव पांडूरंग तान्हाजी देवळे (वय ८० वर्षे, रा. नागरदास, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे असून त्यांच्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार चालू असल्याची माहीती मिळाली. त्यांना सुखरूपपणे त्यांचा मुलगा बबन पांडूरंग देवळे( वय ५५ वर्षे) यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

टिप्पण्या