Akola BJP Rajya Sabha elections : राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीत सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार विजयी घोषित; अकोल्यात भाजपचा जल्लोष!




भारतीय अलंकार 24

मुंबई/अकोला, दि. 11 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

मत मूल्य

विजयी उमेदवारांच्या निवडणूक  क्रमवारीनुसार पियुष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे. इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या फेरीत 4400 मत मूल्य मिळाली आहे. प्रफ्फुल मनोहरभाई पटेल यांना पहिल्या फेरीत 4300 मत मूल्य मिळाली असून संजय राजाराम राऊत यांनाही पहिल्या फेरीत 4100 मत मूल्य मिळाली आहेत. तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 मते वैध ठरली.




भाजपाचा जल्लोष


अकोला: भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भाषा करणारे सर्व पक्ष फिरून येऊन तथाकथित विद्वत्तेचेचे धडे शिकवणारे तत्वांना राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून भाजपा महाराष्ट्रात नंबर वन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपा यश प्राप्त करेल असा विश्वास भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला. 



भारतीय जनता पार्टी कार्यालया समोर भारतीय जनता पक्षाची राज्यसभा उमेदवार केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार पियुष गोयल, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांच्या नेत्रदीपक विजय भाजपा कार्यालय समोर जल्लोष भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 




भारतीय जनता पक्षाच्यावर अनेक आरोप करणारे राजकारणात नवीन माणसं स्वतःला हुशार समजून खालच्या स्तरावर टीकाटिप्पणी करत होते त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली. प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर द्वेष बुद्धीने टीका करून आपण वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वांना मतदारांनी आरसा दाखवला याबद्दल सर्व मतदारांचा आभार व अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले. 



भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी कार्यालय आळशी संकुल समोर आतिषबाजी ढोल-नगारे मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.  



हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असून त्यांच्या रणनीती मुळे 20 जून  होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा भाजपाला विजय प्राप्त होणार असाही विश्वास विजय अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला. 



यावेळी किशोर पाटील, अर्चना मसने, गणेश अंधारे, माधव मानकर, संजय गोडफोडे, संजय जिरापुरे, संजय गोडा, गिरीश जोशी, चंदा शर्मा  एडवोकेट देवाशिष काकड, विलास शेळके, गीतांजली शेगोकार, सुमन गावंडे, अश्विनी हातवळणे, चंदा ठाकूर, रंजना विंचनकर,   हरीश काळे,  सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे,  आशिष पवित्रकार, निशा कडी, वैशाली शेळके, प्रतुल हातवळणे आदीसह भाजपाचे कार्यकर्ते विविध आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या