World Asthma Day: जागतिक अस्थमा दिवस: भारतात 30 दशलक्षाहून अधिक दम्याचे रुग्ण ; योग्य निदान व उपचाराने अस्थमावर नियंत्रण शक्य- डॉ. संजय भारती

World Asthma Day: More than 30 million asthma patients in India;  Asthma can be controlled with proper diagnosis and treatment - Dr. Sanjay Bharti





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जागतिक अस्थमा दिन 3 मे  रोजी साजरा केला जातो. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) अभ्यासाने असा अंदाज लावला आहे की, भारतात 30 दशलक्षाहून अधिक दम्याचे रुग्ण आहे, जे जागतिक भाराच्या 13.09% आहेत. तथापि, मृत्यूदराचा विचार केल्यास सर्व जागतिक अस्थमा मृत्यूपैकी 42% पेक्षा जास्त भारताचा वाटा आहे. विकृती आणि मृत्यूचे प्रमुख कारण असूनही, हा आजार वर्षानुवर्षे निदान होत नाही आणि त्यावर उपचार केला जात नाही. जागतिक स्तरावर केलेल्या लोकसंख्येवर आधारित अभ्यासांनी असा अंदाज लावला आहे की, दम्याचे 20% ते 70% रुग्ण निदान झालेले नाहीत आणि त्यामूळे उपचार केले जात नाहीत,अशी माहिती जागतिक अस्थमा दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ.संजय भारती यांनी दिली.


स्थानिक हॉटेल मध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भारती बोलत होते.



जागृकता आवश्यक


अस्थमाचे कमी निदान आणि उपचार न करण्याच्या विविध कारणांमध्ये रोग बाबत जागरूकता नसणे, इनहेलेशन थेरपीचे खराब पालन, निरक्षरता, गरिबी आणि सामाजिक गैरसमज यांचा समावेश होतो. रुग्ण अनेकदा त्यांच्या सुरुवातीच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात जे त्यांना अधिक गंभीर स्थितीत आणतात. ग्लोबल अस्थमा नेटवर्क (जीएएन) च्या अभ्यासानुसार सुरुवातीची लक्षणे असलेल्या रुग्णापैकी 82% आणि गंभीर दमा असलेल्या रुग्णापैकी 70% रुग्णांचे भारतात निदान झालेले नाही. दैनंदिन इनहेलेशन थेरपीचा वापर करणारे 2.5% पेक्षा कमी रुग्ण निदान झालेल्या रुग्णांमध्ये इष्टतम उपचारांचे पालन कण्याची टक्केवारी देखील खूप कमी आहे,असे देखील डॉ. भारती म्हणाले.



दम्याची लक्षणे


दमा, ज्याला सामान्य लोक सहसा 'स्वास', 'दमा' किंवा 'सर्दी आणि खोकला' म्हणतात, हा एक तीव्र श्वसन रोग आहे. ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते, छातीत दुखते, खोकला आणि घरघर होते. हा रोग फुफ्फुसांचा वायुमार्गावर परिणाम करतो. यामुळे दीर्घकाळ जळजळ होते. वायुमार्ग अधिक संवेदनशील बनतो आणि दम्याचा झटका येण्याची शक्यता वाढते,असे डॉ भारती यांनी सांगितले.



दम्यावर विजय शक्य


जीएएन अभ्यासाचा दाखला देत डॉ. संजय भारती यांनी अस्थमा बदलच्या सामाजिक गैरसमज संबोधीत करण्याच्या महत्वावर भर दिला. जेव्हा अस्थमाचा रूग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतो, तेव्हा फक्त 71% डॉक्टर त्यांच्या आजाराचे नाव म्हणून 'दमा' चे निदान करतात. तर एक तृतीयांश (29%) इतर संज्ञा वापरतात. तसेच रुग्णाच्या पातळीवर केवळ 23% दम्याचे रुग्ण त्यांच्या आजाराला दमा म्हणतात. अस्थमा आणि इनहेलरच्या वापराशी संबंधीत सामाजिक गैरसमज प्रचलित आहे. पुढे, रुग्ण  क्वचितच औषधांचे पालन करतात आणि मुख्यतः लक्षणांवर आधारित उपचार घेतात. दम्या विरूध्द विजय मिळविण्यासाठी जागरूकता, स्वीकृती आणि पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ भारती म्हणाले.



लक्षणे मुक्त दमा मुक्त नाही 


डॉ. संजय भारती यांनी ठळकपणे सांगितले की, दमा हा रोग आजही आपल्या समाजात कलंक मानला जातो आणि बरेच रुग्ण हा आजार लपवतात. जेव्हा लक्ष्णे वाढतात किंवा असहय होतात तेव्हाच रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतो. आणि लिहून दिलेली औषधे घेतो. यानंतर रुग्णांस आराम पडल्या नंतर  रुग्णांना वाटते की आपण पूर्णपणे बरे झालो.मात्र लक्षणे मुक्त दमा मुक्त नाही. अस्थमा व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे आवाहन आहे. बरे वाटल्यावर अनेक रुग्ण इनहेलर वापरणे बंद करतात. हे बंद केल्याने अनेकदा लक्षणे परत दिसून येतात. ज्यामूळे रोगाचे परिणाम बिघडु शकतात. पुढे, इनहेलर्स हानीकारक असणे आणि सवय लागणे यासारखे गैरसमज देखील उपचार न पाळण्यात भुमिका बजावतात. त्यामुळे याकडे  लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ भारती यांनी सांगितले.



संतुलित आहार,व्यायाम आणि उपचार 

                   डॉ. संजय भारती


रुग्णांसाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे ही काळाची गरज आहे. ज्यामूळे त्याला त्याच्या लक्षणांबदल योग्य माहिती आणि निदान मिळण्यास मदत होईल आणि योग्य उपचार लवकर सुरू करता येतील. दम्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर निदान करणे फार महत्वाचे आहे. दम्याच्या रुग्णांनी दम्याची लक्षणे समजून घेतली पाहिजे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. नियमित सकस व संतुलित आहार, व्यायाम, योगा आणि योग्य उपचार घेतल्यास दम्यावर सहज नियंत्रण शक्य असल्याचे डॉ. भारती म्हणाले. 

टिप्पण्या