weightlifting-competitions-vba-akl: स्वाभिमान सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा उत्साहात; मयुरी सुखे, पंकज बांबळे, अनुप इंगळेचे शानदार खेळप्रदर्शन




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बहुजन नायक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचितबहुजन आघाडीच्या भव्य स्वाभिमान सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय महिला व पुरुष वेटलिफ्टींग स्पर्धा रविवार 8 मे  रोजी लालबहादूर शास्त्री स्टेडीयम मधील क्रीडा प्रबोधनी हॉल येथे पार पडली. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या स्पर्धेत मयुरी सूखे, पंकजकुमार बांबळे उत्कृष्ट खेळाडू ठरले. अनुप इंगळे,हर्षल महाजन, रोहित धनकर, यथार्थ यादव, आदित्य भाळशंकर, विक्रम यादव, गायत्री चंदन, सोनाली चौधरी यांनी आपापल्या गटात प्रथम स्थान पटकावले.



प्रमुख उपस्थिती 



अकोला जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते.  स्पर्धेचे उदघाटन राजेंद्र पातोंडे (प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डॉ.धैर्यवर्धन फुंडकर ( वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष) यांच्यासह दीपक गवई, प्रमोद देंडवे, ॲड. संतोष राहाटे, दिनकर खंडारे, युनुस पटेल, वसंतराव नागरे, किशोर जामनिक,  सचिन सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. 



 

सत्कार कार्यक्रम 


याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते विशाल कंडेरा पावर लिफ्टींग नॅशनल प्लेयर, महेंद्र कंडेरा वेट लिफ्टींग खेलो इंडिया, गोल्ड मेडालिस्ट यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक वेटलिफ्टींग पंकज साबळे, ओम रामदास टाकसाळकर यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक सुशील मोहोड वेटलिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संचालन सुभाष वाघ यांनी केले व आभार मिलींद शालीकराम मोहोड यांनी केले. या स्पर्धे करीता पंच म्हणून अभिषेक मिश्रा, पंकज बावने, देवानंद शुक्ला यांनी पहिले.



उत्कृष्ट खेळ प्रदर्शन 



स्पर्धेत हर्षल महाजन,अनुप इंगळे,गौरव  शुकला, रोहित धनकर, अथर्व मिश्रा, निहाल रणपिसे, यथार्थ यादव, लक्ष दुबे, आदित्य भालशंकर, विक्रम यादव, धनंजय पुरवार, मयुरी सुखे, पंकज कुमार बांबळे, गायत्री चंदन, धनवी लोहार, सोनाली चौधरी, संध्या पाठक, नेहा कनोजिया, रूपाली देवकर यांनी सर्वोत्कृष्ट खेळ प्रदर्शन करून स्पर्धेत विजय मिळविला.



टिप्पण्या