wasim chaudhary-coaching classes: कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरीला न्यायालयीन कोठडी




नीलिमा शिंगणे जगड

अकोला : शहरातील चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालक आरोपी वसीम चौधरी याची पोलीस कोठडी 30 मे पर्यंत वाढविण्यात आली होती. आज मुदत संपल्याने न्यायलायसमोर वासिमला हजर केले असता न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आहे.


शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोल्यात रविवारी उघडकीस आली. चौधरी कोचिंग क्लासेसच्या संचालक वसीम चौधरी याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी पाक्सो व आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करुन या संचलकाला बेड्या ठोकल्या होत्या. सोमवारी वसीमला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.  मुदत संपल्यानंतर वसिमला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीत वाढ करुन न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज परत आरोपी वासिमला 14 दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.


दरम्यानच्या काळात पोलीस तपास अधिकारी व पथकाने वसीमच्या घरी व इतर ठिकाणची झाडाझडती घेतली असता अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या आहेत. याबाबतचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. यावरून पोलिसांनी याप्रकरणात आणखी गुन्ह्यांची वाढ केली .वसीम चौधरीवर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी भा दं वि कलम 375(C)(I) नोंदविले. 


अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत मोबाईलवर अश्लील संवाद आणि अश्लील वर्तन करण्याच्या तक्रारीवरून विविध कलमांसोबत पास्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सखोल चौकशी होण्यासाठी सरकार पक्षाने पोलिस कोठडीची केलेली मागणी मंजूर करून तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी.पतंगे यांनी वसीम चौधरीला 26 मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या सखोल चौकशी आणि गुन्ह्याचे समोर आलेल्या पुराव्यानंतर पोलिस कोठडीची मुदत संपली, तेव्हा चौधरीला न्यायालयात सादर करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात बलात्कार सारखा गंभीर गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाल्याने नव्याने भा दं वि कलम 375(C)(I) जोडण्यात आले होते. आज वसीमची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायलयसमोर हजर केले असता 14 दिवसांचा MCR मिळाला.



 पोलिसांची बाजू सरकारी वकील ॲड.राजेश अकोटकर यांनी मांडली तर ॲड.एस.एस.जोशी व ॲड. दिलदार खान यांनी आरोपी चौधरीच्या वतीने युक्तिवाद केला.





काय आहे प्रकरण


अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार,  वसीम चौधरीने आधी मेसेज द्वारे मैत्री करण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर महत्वाचे काम आहे सांगत मुलीला आपल्या घरी बोलावले. काही वेळ बोलल्यानंतर वसीम चौधरीने तिला मागील खोलीत नेले आणि गैरकृत्य करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने त्याला विरोध केला असता याची वाच्यता बाहेर कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी वासिमने दिली. 



यानंतर मुलीने आपबीती आपल्या आईला सांगितली व पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वसीम चौधरी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तसेच कोचीग क्लास सिल केला.



या प्रकरणी वसीम चौधरीला रविवारी सायंकाळी अटक केली होती,सिव्हिल लाइन्स पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम 9 एफ, 10 अल्पवयिन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करणे गून्हे दाखल केले होते. तपास दरम्यान भा दं वि  कलम 375  समाविष्ट करण्यात आला. 











टिप्पण्या