- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
tushar pundkar murder case akot : बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी श्याम नाठे विरूध्द बिगर जमानती अटक वॉरंटचा आदेश पारित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट येथील बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी श्याम नाठे (रा. रामटेक पूरा अकोट,) याचे विरूध्द बिगर जमानती अटक वॉरन्टचा आदेश अकोट सत्र न्यायालयाने पारित केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कार यांनी हा आदेश आज दिला आहे.
तुषार पुंडकर हत्याकांडा तील आरोपी श्याम नाठे विरूध्द अकोट शहर पोलीस स्टेशन येथे (अप कमांक 80/2020) 302,120.120-ब, 201, 34 भा.दं.वि सहकलम 3/25, 5/27, 7/27 आर्म ॲक्ट सह नियम 47/ 177. 130 (1) (2) /177, 3/181 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
विद्यमान मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाने या प्रकरणातील आरोपी श्याम नाठे याला मिळालेला जमानत आदेश रद्द केला होता व या प्रकरणात विद्यमान अकोट सत्र न्यायालयाने 13 मे 2022 पर्यंत अकोट न्यायालयासमोर हजर राहण्याकरिता व या आरोपीला ताब्यात घेऊन या प्रकरणात कारागृहात पाठविण्याकरिता मुदत दिली होती. परंतू,आरोपी याने आज या प्रकरणात उच्च न्यायालयातील जामीन रद्द झाल्यानंतर पुन्हा अकोट सत्र न्यायालयात हजर राहण्याकरिता (सरेन्डर करण्याकरिता) वेळ मागितला. परंतु या अर्जावर सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी लेखी उत्तर सादर करून युक्तिवाद केला की, या प्रकरणात अकोट सत्र न्यायालयाने आरोपीला यापूर्वीच 13 मे 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे. उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपिठाने आरोपीचा जमानत अर्ज रद्द केल्याने आरोपीने आज अकोट सत्र न्यायालयात हजर राहणे सक्तीचे होते. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यात येऊन प्रकरणात त्याला अकोला कारागृहात पाठविण्यात यावे.
दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी श्याम नाठे याच्या विरुद्ध बिगर जमानती वॉरन्टचा आदेश जारी करण्या संबंधीचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीसांना या आरोपीला अटक करून विद्यमान अकोट सत्र न्यायालयात आणावे लागेल.
तुषार पुंडकर खून खटला अकोट सत्र न्यायालयात चालविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम याची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अकोट येथील सरकारी वकील अजित देशमुख या खटल्याचे कामकाज पाहत आहेत.
अशी घडली होती घटना
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवार 21 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री उशीरा अज्ञातांनी गोळीबार केला होता. अकोट शहरातील पोलिस वसाहतीमध्ये ही घटना घडली होती. त्यात तुषार पुंडकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा