telangana tourism two youth died : तेलंगणा राज्यात पर्यटनाला गेलेल्या अकोल्यातील दोन युवकांचा मृत्यू; भौरद व भारती प्लॉट परिसरात शोककळा




भारतीय अलंकार 24 

अकोला: डाबकी रोड परिसरातील प्रतिक गावंडे व किरण लटकुटे हे दोन युवक तेलंगणा राज्यातील बासर येथे पर्यटनाला गेले असता, नदी पात्रात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. या घटनेमुळे भौरद आणि भारती प्लॉट परिसरात शोककळा पसरली आहे.



14 मे  रोजी तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्हयातील भायनासा तालुक्यातील बासर येथे अकोला जिल्हयातील मौजे भौरद येथील प्रतिक महेश गावंडे वय 22 वर्ष व भारती प्लॉट जुने शहर येथील किरण लटकुटे वय 21 वर्ष हे दोन मुले बासर येथे गेले असता तेथील नदीमध्ये पडुन त्यांचा मृत्यु झाला आहे. दोघेही पर्यटनासाठी तेलंगणा राज्यामध्ये गेले होते.


आमदार रणजित सावरकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सूत्रे हलविली. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या घटनेच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत मदत करण्याबाबत प्राप्त सुचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी भायनसाचे जिल्हा महसुल अधिकारी रमेश राठोड यांचेशी संपर्क साधला असुन त्यांनी भायनासाचे तहसीलदार यांना सदर घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले. खडसे यांनी भायनासाचे तहसीलदार यांचेशी सुध्दा संपर्क केला. 



प्राप्त माहिती नुसार दोन्ही मुलांच्या मृतदेहाचा शोध लागला असुन त्यांना शवविच्छेदनासाठी भायनासा येथील शासकीय वैदयकीय महाविदयालयामध्ये नेण्यात आले. तसेच प्रशासनामार्फत त्यांचे सोबतचे मित्र व नातेवाईक यांचेशी संपर्क झाला असुन शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचे नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. आज रविवार सकाळी त्यांना अकोला येथे आणण्यात येईल, अशी माहिती प्रा संजय खडसे यांनी दिली आहे. 

टिप्पण्या