Summer sports training camp Akola: उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप; शिबीरात 328 नवोदित खेळाडूंचा सहभाग





अकोला दि.4: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित अनिवासी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोमवारी करण्यात आला. जिल्हा क्रीडा विभागातर्फे वसंत देसाई स्टेडीयम येथे व‍िव‍िध खेळांचे अन‍िवासी न‍ि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण श‍िबीराचे आयोजन द‍ि. 12 ते 30 एप्रिल दरम्यान  करण्यात आले होते. 



या शिबीरामध्ये कुस्ती, बॉक्सींग, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, वेटल‍िफ्टींग या खेळाचे समावेश करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये एकूण मुले व मुली 328 खेळाडूंनी सहभाग घेतला. या शिबिराचा समारोप सोमवारी पार पडला.



समारोप प्रसंगी जिल्हा क्रीडा अध‍िकारी गणेश कुळकर्णी, सतीशचंद्र भट, लक्ष्मीशंकर यादव, विजय खोकले, पंकज बांबळे, अजय जारवाल हे उपस्थित होते. 



याप्रसंगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू बॉक्सींग दिया बचे आणि अभिषेक मिश्रा, रितीक साबळे, सांकेत सरगर, रोहित वानरे (वेटलिफ्टींग) यांचीही उपस्थिती होती. 



या शिबिरात खेळाडूंना कुस्ती- लक्ष्मीशंकर यादव, बॉक्सींग- सतीशचंद्र भट, कबड्डी- विजय खोकले, अरूण इंगोले, खो -खो- रवी रामटेके, व्हॉलीबॉल- योगेश घुगे, हॅण्डबॉल- गोविंद दरपे, बास्केटबॉल- केतन गजभिये, वेटलिफ्टींग- पंकज बांबळे यांनी प्रशिक्षण दिले.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा कार्यालयाच्यावतीने प्रमाणपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले.

टिप्पण्या