- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Sambhaji-Raje-Jayanti-Rally-Akola: कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या 15 बुलेट चालकांवर पोलीस कारवाई: छावा संघटनेची सिटी कोतवालीवर धाव; आमदारांच्या मध्यस्थीमुळे प्रकरणावर पडदा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: छत्रपति संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त शनिवारी सायंकाळी शहरात शिवाजी पार्क येथून निघणाऱ्या मोटरसायकल रॅलीमधे सहभागी होण्यासाठी जात असलेल्या 15 बुलेट गाड्यावर शहर वाहतूक पोलीसांनी कारवाई केल्या विरोधात छावा संघटनेने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. मात्र आमदार रणजित सावरकर यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळून, वाहनधारकांवर होणारी पुढील कारवाई टाळण्यात आली.
शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर शहर वाहतूक पोलिसांची ही कारवाई सुरू असताना शनिवारी संभाजी राजे जयंती निम्मित आयोजित मिरवणूकमधे सहभागी होण्यासाठी जात असलेल्या 15 बुलेटस्वारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. बुलेटवर कारवाई केल्या विरोधात सिटी कोतवाली पोलिस स्टेशन वर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शंकरराव वाकोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यामुळे सिटी कोतवाली चौकात गर्दी झाली होती. प्रकरण चिघळले होते. मात्र अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या मध्यस्थीमुळे बुलेट चालकांवरील पुढील कारवाई टाळण्यात येवून प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी छावा संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून संभाजी राजे यांना वंदन करण्यात आले. शहरातील शिवाजी पार्क येथून काढण्यात आलेली मोटारसायकल रैली मानेक टॉकीज, जुना कापड बाजार, सिटी कोतवाली चौक, खुले नाट्यगृह चौक, बसस्थानक समोरुन मार्गक्रमण करीत जवाहर नगर चौक पार्कमध्ये मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीव्दारे छत्रपती संभाजी राजे यांचा जयघोष करीत त्यांना वंदन करण्यात आले. या मोटारसायकल रॅलीत छावा संघटनचे अकोला जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
छावा संघटना
Bullet Drivers
Chhatrapati Sambhaji Raje
city kotwali
motorcycle rally
Police Action
Police station
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा