sachin limaye-Art of living-Akola: गायक सचिन लिमये यांची 'सुमेरू संध्या' रविवारी अकोल्यात




अकोला: जगभरात माणुसकी, प्रेम, शांती, सदाचाराची शिकवण देणाऱ्या प. पु. श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने गुरुदेवांच्या जन्म उत्सव पर्वावर अकोलेकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी, या उदात्त हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक सचिन लिमये यांची भव्य संगीत संध्या अर्थात सुमेरू संध्येचे आयोजन रविवार 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित केली असल्याची माहिती आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने देण्यात आली.


स्बिर्ला कॉलोनी येथे बुधवारी झालेल्या आर्ट ऑफ लिविंगच्या पत्रकार परिषदेत या सोहळ्याची व आर्ट ऑफ लिविंगच्या विकासात्मक उपक्रमांची माहिती देण्यात आली. 




प्रस्तुत संगीत संध्या ही अकोलेकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली असून नागरिकांनी या संगीतमय संध्येचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 





हा कॉन्सर्ट सफल करण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेवलपमेण्ट कमिटी सदस्य जगन्नाथ कराळे, अरुण देशमुख, पुरुषोत्तम पसारी, हरीश लाखानी, श्रीकांत पडगीलवार, महेंद्र खेतान, दीपक मायी, डॉ सुनील थावराणी, सुरेश माहेश्वरी, जसवंत कावना, कपिल ठक्कर व शिक्षकगण कैलाश अग्रवाल, रामकृष्ण दालमिया, संजय शेळके, प्रशांत साबळे, सुधीर इंगळे, प्रवीण शिंदे, दिनेश मुरझानी, ज्ञानेश्वर कपले, संतोष मारशेट्टीवार, अंबादास सिंघनिया, अर्चना मारशेट्टीवार, निलेश चौधरी, श्रीकांत पाटील दिने, आशिष डोडिया, दीपक वोरा, डॉ संकेत अग्रवाल, एड कांचन शिंदे, अक्षय जोशी, डॉ निराली अग्रवाल, श्वेता मुरझानी, सुनीता तिवारी, आरती देशपांडे, दर्शन खंडेलवाल, राम घायाळकर समवेत आर्ट ऑफ लिविंग परिवारातील पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.



टिप्पण्या