pocso case-pocso act- Akola court: अल्पवयीन मुलीस गुजरातला पळवून नेवून अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकास आजन्म कारावासाची शिक्षा





नीलिमा शिंगणे जगड

अकोला: अकोट फाईल येथे आजी कडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यात पळवून नेवून, तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकास आज अकोला न्यायलयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.



न्यायनिवाडा 


अकोट फाईल पो. स्टे. येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी सागर रमेश शंभरकर  याला अल्पवयीन मुलींचे वारंवार शोषण केल्या प्रकरणी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर  यांच्या न्यायालयात भा. द. वी. कलम 363 मध्ये 7 वर्षे कारावास, रू 10000/- दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा, 376, 376(2) (एन) व पॉक्सो कायदा कलम 3-4-5 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमा मध्ये रू 400000/- दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी 6महिन्याची अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागेल.  एकूण रू 410000/- चा दंड ठोठावण्यात आला. 



घटनेची हकीकत 


4 ऑक्टोबर 2016 रोजी पीडितेच्या आजीने फिर्याद दिली की, शाळेत गेलेली नात घरी परत आली नाही म्हणून ती हरवल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली, त्यानंतर सहा महिन्यांनी पीडित व आरोपी पोलिस स्टेशनला हजर झाले व पिडीतेने ती आरोपी सोबत दरम्यानचे काळात गुजरात मध्ये होती व तिथे ते पती पत्नी सारखे राहत होते असे सांगितले. अल्पवयीन पीडितेस पालकांच्या समती शिवाय घेऊन जाणे व तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा या प्रकरणात सिद्ध झाल्याने न्यायनिवाडा करण्यात आला. 



आठ साक्षीदारांची साक्ष 


सरकार तर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले होते. पी. एस. आय. छाया वाघ यांनी या प्रकरणाचा तपास केला होता, सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. एच. सी. अरुण चव्हाण व सी एम एस चे ASI प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.

टिप्पण्या