Nitin Gadkari-Four lane road-flyover: अवघ्या काही तासात ना. नितीन गडकरी यांचे राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन: चौपदरी रस्ता व उड्डाणपूलाचे करतील लोकार्पण





भारतीय अलंकार 24

अकोला: जागतिक विक्रम करून भारताचे नावलौकिक करणारे विकासपुरुष केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी राजराजेश्वर नगरीमध्ये 365 कोटी रुपयांच्या विकास कामे तसेच गौण खनिज उत्थान पासून शेततळे निर्माण करून शेतकऱ्यांच्या जीवनात वैभवशाली दिवस निर्माण करण्याच्या दृष्टीने विकास कामाचा आराखडा जनतेला समर्पित करण्यासाठी 28 मे शनिवार रोजी येत असून, केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजप अध्यक्ष आ.रणधीर सावरकर,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जेष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ.प्रकाश भारसाकळे,आ.हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात 2000 कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.


अकोला शहराच्या वाहतुकीची कोंडी तसेच कमी खर्चात दळणवळणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शिवर ते रिधोरा 13 किलोमीटर चा सिमेंट काँक्रीटी करून चौपदरी करण रस्त्याचे लोकार्पण तसेच दक्षता नगर ते हुतात्मा स्मारक संत कवरराम उड्डाणपूल तसेच शाहिद भगत सिहं चौक ते अग्रसेन चौक भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीने 28 मे रोजी दुपारी 02:30 वाजता हा ऐतिहासिक विकासाचा क्षण जनता जनार्दनाच्या साक्षीने समर्पित होणार आहे.या उड्डाणपुलाला अंडरपास निर्माण करण्यात आले आहे. 



या कार्यक्रमात जिल्हाचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नॅशनल हायवे चे दिलीप ब्राह्मणकर, राजीव अग्रवाल, आ.रणजित पाटील, आ.अमोल मिटकरी, आ.किरण सरनाईक, आ.वसंत खंडेलवाल, आ.गोवर्धन शर्मा,आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ.नितीन देशमुख, आ.राजेंद्र पाटणी, आ.आकाश फुंडकर,आ.संजय कुटे,आ.श्वेता महाले, आ.लखन मलिक आदी मंचावर विराजमान राहणार आहे.




तसेच बार्शीटाकळी रेल्वे उड्डाणपूल तसेच अकोट रेल्वे उड्डाणपूल तसेच अकोला वाशीम अकोट बायपास प्रस्तावित असून याला सुद्धा ना.नितीन गडकरी व जिल्ह्यातील अनेक विकास कामांना भरघोस निधी देण्याची घोषणा करण्यात येणार आहे.ना.नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशात प्रथमच गौण खनिजाचा उपयोग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ च्या जमिनीला होऊन आर्थिक लाभासोबत 800 हेक्टर बागाईत जमीन तसेच अकोला बुलढाणा जिल्ह्यातील 89 गावे लाभांकीत होऊन 176 विहिरींची पाण्याची पातळी वाढून लासूर तलाव निमकर्दा टाकळी,कवठा बॅरेज,विद्रुप नदी,हसनापूर तलाव तसेच शेततळे पासून 84.31 लक्ष क्युरीक पाण्याचा पुरवठा वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाले आहे.



 पार्किंग व्यवस्था


पार्किंगची व्यवस्था चार ठिकाणी केली आहे. भाटे क्लब,शास्त्री स्टेडियम,जिल्हापरिषद शासकीय कन्या विद्यालय वसंत देसाई स्टेडियम समोर, उर्दू हायस्कुल हॉटेल स्कायलार्क च्या बाजूला रतनलाल प्लॉट येथे करण्यात आली आहे.




असा आहे दौरा 


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार दि.28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-


शनिवार दि.28 रोजी सकाळी साडेदहा वा. वणीरंभापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन व वणी रंभापूर येथील तलाव पाहणी, सकाळी 11 वा. 15 मि. नी. बाबुळगाव तलावाची पाहणी, सकाळी 11 वा. 40 मि. नी. अमृत सरोवर  पुस्तक प्रकाशन सोहळा, स्थळ- डॉ. ठाकरे सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी साडेबारा वाजता कमिटी हॉल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे पत्रकारांशी संवाद. दुपारी एक वा. खा. संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- रणपिसेनगर, जागृती विद्यालयाच्या मागे, अकोला, दुपारी 1 वा.20 मि.नी. रावणकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ-रामनगर, रतनलाल प्लॉट,अकोला, दुपारी पावणेदोन वा. विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट व राखीव.स्थळ- पुष्पलता, आळशी प्लॉट, अकोला. दुपारी साडेतीन वा. अकोला शहरातील दोन उड्डाण पूल व अमृत सरोवर या दोघा प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती,स्थळ- क्रिकेट क्लब मैदान, अकोला, पावणे पाच वा. अकोला विमानतळावरुन नागपूरकडे हेलिकॉप्टरने रवाना.






टिप्पण्या