- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Navjot Singh Sidhu-road rage case: नवज्योत सिंग सिद्धूला 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
नवी दिल्ली : क्रिकेटर तथा पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूला 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
या शिक्षेवर नवज्योतसिंग सिद्धूने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याच्या गौरवासाठी मी स्वत:ला सादर करणार असल्याचे ट्विट त्यानी केले आहे. या ट्विटवरून सिद्धू न्यायालय किंवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे मानले जात आहे.
सिद्धूवर 34 वर्षांपूर्वी पटियाला येथे रस्त्यावरच्या वादातून गुरनाम सिंग यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. गुरनाम सिंग यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. रस्त्यावरील भांडणाचे हे प्रकरण 27 डिसेंबर 1988 रोजी घडले होते. पतियाळा येथे कारमधून जात असताना नवज्योतसिंग सिद्धू गुरनाम सिंग नावाच्या वृद्धाच्या अंगावर धावून गेला होता.
रागाच्या भरात नवज्योत सिद्धूने त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होता, त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. ट्रायल कोर्टाने 1999 मध्ये पुराव्याअभावी नवज्योतसिंग सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु पीडित पक्षने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. गुरनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, सिद्धूने गुरनाम सिंग यांच्या डोक्यावर ठोसा मारला आणि गुरनाम सिंग यांना ब्रेन हॅमरेज झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथून त्यांना दिलासा मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये एक हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली. यानंतर गुरनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. यानंतर आज सुप्रीम कोर्टाने त्याला एक वर्षाची सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे.
सर्वोच्च न्यायालय शिक्षा आज सुनावत असताना हत्तीवर स्वार होऊन महागाईच्या मुद्द्यावरून पटियालामध्ये सिद्धू आंदोलन करत होते.
नवज्योत सिंग सिद्धू
सश्रम कारावास
congress party
cricketer
Navjot Singh Sidhu
road rage case
sentenced
Supreme Court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा