Mahesh Navami celebration Akola: माहेश्वरी समाजाची महेश नवमी उत्सव बुधवार पासून होणार प्रारम्भ;श्री राज राजेश्वर मंदिर पासून निघणार भव्य शोभायात्रा




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: माहेश्वरी समाजाचा उत्पत्ति दिवस पावन महेश नवमी  8 जून रोजी सकल माहेश्वरी समाज साजरी करीत असतो या अनुषंगाने माहेश्वरी समाज ट्रस्ट व संशा संस्थांच्या वतीने महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये अनेक रंगारंग उपक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 


माहेश्वरी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्ट के अध्यक्ष विजय पनपातिया,प्रधानमंत्री विजयकुमार राठी महिला मंडळाच्या अध्यक्ष हेमा खटोड, सचिव वंदना हेडा, उत्सव प्रमुख शरद चांडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.




बुधवार पासून उत्सवाचा प्रारंभ होणार असून  सकाळी 9 वाजता माहेश्वरी भवनात भगवान महेश याच्या झाकीची विधिवत स्थापना करण्यात येणार असून सकाळ व संध्याकाळी संगीतमय आरती होणार आहे याच दिनी सकाळी 9.30 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात फळ व मिष्ठान वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने जुन्या आर टी.ओ रस्त्यावरील महेश भवन येथे युवक युवतींचा रंगारंग उडान हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दिनांक 3 जून रोजी सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना फळ व मिठाई वितरित करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता माहेश्वरी भवन येथे वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठ च्या वतीने चर्चा सत्र होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 





शनिवार ४ जून रोजी सकाळी ९.३० वाजता माहेश्वरी भवन येथे वर्ग ८ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे सायंकाळी ५.०० वाजता मित्र समाज क्लब येथे दोन दिवसीय भव्य बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या जाणार आहे. सायंकाळी 6.30 वाजाता जुन्या शहरातील शंकरलाल खंडेलवाल कॉलेज येथे प्रसिद्ध जीवन प्रेरक अहमदाबाद येथील विक्की पारेख यांचा रीश्तो की डोर हा जीवन मार्गदर्शन कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रविवारी सकाळी ६.०० वाजता समाजाची भव्य मॅरेथॉन स्पर्धा स्थानीय माहेश्वरी भवन येथून सुरु होणार आहे. याच दिवशी सकाळी ७.०० वाजता महाआरोग्य शिबीर होणार असून या शिबिरात विविध आजारांचे तज्ञ समाज बांधवांची आरोग्य तपासणी करणार आहेत. तसेच या उपक्रमात माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता महेश्वरी महिला मंडळ च्या वतीने कण कण में है भगवान ही सांस्कृतिक झांकी साकार करण्यात येणार आहे. 



सोमवार ६ जून रोजी सकाळी ८.०० वाजता माहेश्वरी प्रगती महक च्या वतीने चेस करम स्लो सायकल आदी विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. याच दिनी सकाळी ११.३० वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रमोद सोहनलाल चांडक यांच्या वतीने भोजन वितरित करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता नवयुवतीच्या वतीने मुंबई येथील प्रशीक्षक निशा चांडक यांचा डिजाईन युअर डेथ हा जीवनाला कलाटणी देणारा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता वरिष्ठ नागरिक प्रकोष्ट वतीने कमी होत असलेल्या लोकसंखेला जबाबदार कोण या विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंगलवार ७ जून रोजी दुपारी ४ शिक्षण समिती अमरावती चे अध्यक्ष अशोक राठी यांच्या हस्ते तसेच विनोदवात यांच्या उपस्थितीत नर्सरी ते पदवीत्तर पर्यंत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.



मुख्य महेश नवमी सोहळा बुधवार ८ जून रोजी होणार असून या दिनी सकाळी ९.३० वाजता प्रमुख पाहुणे अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे कोषाध्यक्ष मुंबई येथील सीए आर एल काबरा यांच्या हस्ते माहेश्वरी समाज ट्रस्ट च्या वेबसाईट चे लोकार्पण करण्यात येणार असून व्यापार काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.०० वाजता राज राजेश्वर मंदिर येथून भगवान महेश यांची विविध देखावे व झांकी समवेत शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, ब्रजलाल बियाणी चौक, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, महानगरपालिका चौक, तहसील मार्गे श्रीमती ल. रा. तो माहेश्वरी भवन येथे पोहचून या शोभायात्रेच नवमी उत्सवात रूपांतर होणार आहे. समाज ट्रस्ट चे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या नवमी सोहळ्यात प्रमुख पाहुणे रामेश्वरलाल काबरा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत. 



नवमी उत्सवाचे समापन माहेश्वरी प्रगती मंडळ च्या वतीने आयोजित दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संपूर्ण महेश नवमी उपक्रमांचे यजमान श्रीकांत श्रीविष्णू लोष्णीवाल, सुनील इन्नाणी, डॉ नरेंद्रकुमार संतोष हेडा, नरेंद्र शैलेश भाला, जगदीश मुकुंद राठी, प्रकाश आदित्य भैप्या, राहुल नकुल राठी विजय संजय हेडा, गोविंद शंकरलाल बजाज, आनंद मोहमलाल चांडक, प्रमोद माणिकचंद मालपाणी, संतोष शंकरलाल सठी. एड. सतीश मनीष भुतडा, प्रमोद अंकित काचोलीया आदी मान्यवर राहणार असून या आठ दिवसाच्या महोत्सवाच्या उपक्रमांचा समाजातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव प्रमुख शरद चांडक यांनी यावेळी केले. 





महोत्सवाच्या सफलतेसाठी माहेश्वरी समाज ट्रस्ट चे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, सुधीर रादड, सहसचिव विनीत बियाणी, कोषाध्यक्ष आशिष पनपालीया, अंकेक्षक अनिल लदूरीया, विजयकुमार तोष्णीवाल, राजेश लोहिया, अनिल राठी, नरेश बियाणी, द्वारकादास चांडक, पुरुषोत्तम खटोड, मनीष लब्बा, नंदकिशोर बाहेती प्रा डॉ. रमण हेडा, प्रवीण हेडा, मनोज चांडक, राजेश सोमाणी, शैलेश तोष्णीवाल, राजेश भन्साळी, एड विशाल ला प्रमोद लटरीया, महेश मुंदडा, दीपक राठी, प्रदीप राठी तसेच माहेश्वरी प्रगती महळचे अध्यक्ष सागर लोहिया, नवयुवती मंडळ च्या अध्यक्ष श्रध्दा धूत, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ के अध्यक्ष भगवानदास तोष्णीवाल, महिला प्रकोष्ठ च्या अध्यक्ष शारदा मंत्री आदी परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



टिप्पण्या