flyover-akola city-bjp-sanjay dhotre: अकोला शहरातील चारही दिशांना जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपूलाचे लवकरच लोकार्पण !






नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहराच्या तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दळणवळण,वेळेची बचत, तसेच सौंदर्यकरण व गौरवशाली इतिहासात भर घालणारा उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून, या उड्डाणपुलाचे लोकार्पण लवकरच ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.



अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपले सहकारी अभियंता ॲडव्होकेट अभ्यासू नेतृत्व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे व अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर याच्या सहकार्याने अकोला शहरामध्ये विदर्भात प्रथमच तीन राम्प अंडरपास अंदाजे 163 कोटी रुपयाचे उड्डाणपुल केंद्रीय रास्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करून उड्डाणपूल चार कि.मी. पूल 12 मिटर रुंदीचा 3 वर्षात उभा केला आहे. लवकरच या उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहोळा होऊन शहरातील चारही दिशांना जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपूलाचा अकोला शहरातील पाच लाख नागरिकांना लाभ होणार आहे.




    

हा उड्डाणपूल अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन तसेच बाळापुर रोड दक्षता नगर ते अमरावती रोड मार्गे आळसी प्लॉट असे दोन पूल ना. नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून  खा. संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ रणधीर सावरकर, आ वसंत खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी या उड्डाणपुलावर विद्युत पोल तसेच इतर ठिकाणी उड्डाणपूल झाल्यानंतर आलेल्या अडचणी अपघाताची परिस्थिती याचा सखोल अभ्यास करून या पुलावर सिग्नल व्यवस्था तसेच पट्टे, बोर्ड, येत्या 15 दिवसात संपूर्ण यंत्रणा सज्ज करून अकोला शहरातील पूर्व पश्चिम- दक्षिण उत्तर या दिशांना जोडणारा मार्ग सुसज्जित करून केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी व भाजपाचे विविध लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तसेच राज्यातील मंत्री यांचा सहभाग घेऊन हा लोकार्पण सोहोळा करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलले आहे.



 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ब्राह्मणकर तसेच रामकुमार Construction चे व झेंडू construction चे रावत व त्यांच्या देखरेखीत तीन वर्षात हे पूल निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षांनी अकोलेकरांना दिलेल्या वाचनाची पूर्तता खा. संजय धोत्रे आ. गोवर्धन शर्मा, आ रणधीर सावरकर यांनी पूर्ण केली आहे. 





नागरिकांना त्रास होणार नाही व चांगल्या दळणवळण व्यवस्था व सध्याच्या जागतिक इंधन संकटाच्या काळात दीर्घकालीन लाभाच्या दृष्टीने जुने शहर तसेच नवीन शहर , रणपिसे नगर ,जठारपेठ, उमरी, रामदासपेठ, सिंधी कॅम्प, गौरक्षण रोड, मुर्तीजापूर रोड कौलखेड, वाशीम बायपास,अकोट फैल आदी भागातील जाणाऱ्या नागरिकांना इंधन बचातीसोबत चांगल्या दळणवळणच्या सोई सोबत अकोलेकरांच्या भावना लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. 



टिप्पण्या