भारतीय अलंकार 24
अकोला: निराधार आणि विधवा महिलांसाठी राज्यमंत्री तथा अकोला जिल्हाचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ' डिझल तुमचं ट्रॅक्टर आमचं ' योजना राबविण्यात आली.
या उपक्रमात जिल्ह्यातील 153 निराधार आणि विधवा महिलांची निवड करण्यात आली आहे. कृषि विभागामार्फत ही योजना सुरू राहणार असून, यामध्ये डिझलचा खर्च शेतकरी महिलांना करावा लागणार आहे तर शेत तयार करण्यासाठी लागणार ट्रॅक्टर योजनेमार्फत देण्यात येणार आहे.
शेत तयार करण्यापासून ते शेतमाल काढणी पर्यंत स्थानिक प्रशासन या महिलांची मदत करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज अकोला जिल्ह्यातील वरुळ जऊळका येथून करण्यात आली. आज बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टरच स्टेरिंग हाती घेऊन शेत तयार करायला सुरुवात केली.
हा पायलट प्रोजेक्ट म्हणून अकोला जिल्ह्यात सुरू करण्यात आलं असून यशस्वी झाल्यास हे राज्यभर राबविणार येणार असेलच,असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा