Dagdaparva dam: दगडपारवा धरणाच्या साचलेल्या पाण्यात दोन मुलीसह आईचा मृत्यू



ठळक मुद्दे 


दोन मृतदेह तरंगताना दीसुन आले तर एक मृतदेह आज सकाळी गावक-यांनी बाहेर काढला घटनास्थळी 6-7 फुट खोलपाणी होते.

  

1 मे 2022 रोजीची सायंकाळची घटना



नीलिमा शिंगणे जगड  

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणाच्या पाण्यात बुडून दोन मुली व त्यांची आई अश्या तिघींचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्र दिनी सायंकाळी घडली. म्हशीच्या शोधत या तिघी धरणाकडे गेल्या होत्या,अशी प्राथमिक माहिती आहे.



नातेवाईकांच्या सांगण्यावरून प्राप्त झालेला घटनाक्रम, 1 मे रोजी अंदाजे दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान म्हशीच्या शोधात आई सह गेलेल्या दोन मुली घरी परतल्या नसल्याने नातेवाईक सह गावक-यांनी शोध घेतला असता, धरणाच्या मागील बाजुला गावा शेजारी असलेल्या पाण्याच्या काठावर एक चप्पल मिळुन आली. याच संशयावरून या तीघी मायलेकी पाण्यात बुडाल्याची गावक-यांना दाट संशय आला. परंतु रात्र झाल्याने येथीलच सरपंच विठ्ठल महल्ले यांनी तात्काळ तहसीलदार गजानन हामंद आणी जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला. 

मात्र दिपक सदाफळे हे कारंजा येथील इमर्जन्सी रुग्णाला घेऊन सेवाग्राम येथे गेले असल्याने रात्री संपर्क होऊ शकला नाही.  


रात्री दोन मृतदेह गावकऱ्यांना पाण्यावर तरंगताना दीसुन आले आणी एक मृतदेह काढण्यासाठी बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांनी तसेच बार्शिटाकळी पोलीसांनी आज सकाळी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. लगेचच जिवरक्षक दीपक सदाफळे हे आपल्या टीमसह रवाना झाले असता, तोपर्यंत आज सकाळी तीसरा मृतदेह गावक-यांच्या मदतीने शोधुन बाहेर काढण्यात  होता. 



यावेळी दगडपारवा सरपंच तथा पत्रकार विठ्ठल महल्ले, तहसीलदार गजानन हामंद आणी बार्शिटाकळी पो.स्टे.चे ठाणेदार व पोलीस कर्मचारी हजर होते, अशी  माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

टिप्पण्या