- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
congress gujarat state hardik patel: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका; हार्दिक पटेल यांनी अखेर काँग्रेसचा घेतला निरोप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. हार्दिक पटेल यांनी अखेर काँग्रेसचा निरोप घेतला आहे. हार्दिक पटेल यांनी ट्विट करत काँग्रेस सोडण्याची घोषणा आज केली आहे.
"आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट हार्दिकने केले आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन." असे हार्दिक पटेल यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.
पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी यापूर्वी देखील काँगेसवर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांसमोर त्यांनी जाहीरपणे देखील नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हेतर त्यांनी याबाबत केंद्रीय हायकमांडलाही सुध्दा सांगितले होते. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल काँग्रेस वरिष्ठ नेत्यांकडून घेतली गेली नाही. दरम्यान हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेस आणि कार्याध्यक्ष पद काढून टाकले होते. तेव्हापासून ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा राजकिय वर्तुळात होती.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये जाण्याचा पर्याय हार्दिक पटेल यांच्यासाठी मोकळा आहे, मात्र, प्रदेश भाजपने हार्दिक पटेल बद्दल अद्याप कोणतीही उत्सुकता दाखवलेली नाही, तर 'आप' त्याच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे म्हंटल्या जात आहे. विधानसभेच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का राजकीय वर्तुळात मानला जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा