Anjalitai-Ambedkar-vba-party-akola: निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गेली 25 वर्षें पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या ऋणामध्ये आपण कायम राहणार- प्रा. अंजलीताई आंबेडकर




भारतीय अलंकार 24 

अकोला: स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे 11 मे रोजी बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित स्वाभिमान सप्ताह समारोप, कृतज्ञता सोहळा, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्कार सोहळा व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा अंजलीताई आंबेडकरांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गेली 25 वर्षें पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या ऋणामध्ये आपण कायम राहु, असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली. 





तत्पूर्वी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर राजेंद्रभाऊ पातोडे यांचे व्याख्यान पार पडले.






यावेळी VBA Bodybuilding show, लेझीम व लाठाकाठी प्रात्यक्षिक स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेटलिफ्टींग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,गित गायन स्पर्धा,संगीत वाद्य वादन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 





कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.






यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर , युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट,पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकंद भिरड जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष व बुलढाणा प्रभारी प्रदीप वानखडे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जि प अध्यक्ष प्रतिभा भोजने जि प उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती आकाश शिरसाट, जि प सदस्य पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, कलीम खान पठाण, वंदना वासनिक, राम गव्हाणकर, संगीता अढाऊ, माया नाईक, सुशांत बोर्डे, अनंता अवचार, ज्ञानेश्वर सुलताने, आम्रपाली खंडारे, दिनकर खंडारे, विनोद देशमुख, निता गवई, योगीता रोकडे, परवीन मुक्तार, सुनिल फाटकर, दामोदर जगताप, किरण बोराखडे, एड संतोष रहाटे, दीपक गवई, अशोक शिरसाट, गजानन गवई, सुशील मोहोड, नितीन सपकाळ हे उपस्थित होते.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद देंडवे यांनी तर संचालन सचिन शिराळे व सुवर्णा जाधव यांनी केले. 





कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास सदांशिव,गजानन दांडगे,श्रीकृष्ण देवकुणबी, भुषण पातोडे, हरीष रामचवरे, विश्वा खंडारे, रामेश्वर गायकवाड, अजय पातोडे आदींनी परिश्रम घेतले.



टिप्पण्या