Spiritual Ceremony Vitthal Katha: अकोल्याच्या गोरक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या विठ्ठल कथा मंडपाचा भूमिपूजन सोहळा





ॲड. नीलिमा शिंगणे- जगड 

अकोला : श्री विठ्ठल परिवार अकोला द्वारा संपूर्ण पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच गोमातेच्या पावन सानिध्यात म्हणजेच श्री गोरक्षण संस्था, गोरक्षण रोड, अकोला येथे सोमवार 25 ते शुक्रवार 29 एप्रिल 2022 दरम्यान सायंकाळी 7 ते 9.30 या वेळेत भव्य दिव्य श्री विठ्ठल कथा, विठ्ठल नाम संकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.




त्याप्रीत्यर्थ मंडप भूमिपूजन गुरुवार 14 एप्रिल रोजी विठ्ठल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व विठ्ठल साहित्याचे अभ्यासक, विठ्ठल कथाकार गुरुवर्य तात्या महाराज गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ह भ प नाना महाराज उजवणे व प्रसिद्ध उद्योजक दीपकबाबु भरतिया यांच्या शुभहस्ते करण्यात आला.




सर्वप्रथम श्री भगवान विठ्ठलाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली, तद्नंतर लगेचच ह भ प नाना महाराज उजवणे ह भ प तात्या महाराज गावंडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, दीपक बाबु भरतिया, महेशकुमार खंडेलवाल व विजय जानी यांनी टीकास कुदळ मारून भूमिपूजन केले. 



यावेळी विठ्ठल परिवार अकोलाचे सन्माननीय जगन्नाथ वानखडे, प्रशांत पाटील, सहदेवराव शिंदे, संतोष पिसे, भानुदास धोटे, सुरेश सावरकर, शेषराव शिंदे, प्रकाश शिंदे, सुरेश तळोकार, श्रावण फाले, चंद्रकांत अवचार, हरिचंद्र पिसे, बबन काळे, तुषार फाटकर, अजय पाटील, भीमराव पवार, नितीन मोडक, किशोर तावरे. विजय पिंपळकर, गजानन मालठाणकर व युवराज कदम इत्यादींसह शहरातील बरेच मान्यवर मंडळी तसेच परिसरातील मंडळी, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




विशेष म्हणजे श्री विठ्ठल कथा ह भ प तात्या महाराज गावंडे यांच्या अमृतुल्य वाणीतून होणार आहे. या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व 26 एप्रिल रोजी पाचशे जोडप्यांचं श्रीविठ्ठल तुळशी अर्चना व इतरही प्रासंगिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे, पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल परिवार अकोला यांच्या वतीने केले आहे.



टिप्पण्या