shegaon railway station: bhusawal: शेगाव: रेल्वेस्थानक शासकीय सल्लागार समिती स्थापन; शहरातील दहा व्यक्तींचा समावेश





भारतीय अलंकार 24

शेगाव : भुसावळ रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या शेगाव रेल्वे स्थानकासाठी शासकीय सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्याचे खासदार तथा रेल्वे बोर्ड सदस्य प्रतापराव जाधव यांच्या शिफारशीनंतर या समितिवर शहरातील विविध क्षेत्रांमधील दहा व्यक्तींना भुसावळ रेल्वे मंडळाच्या वाणिज्य विभागाकडून नियुक्ती देण्यात आलेली आहे.




             

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयी सवलती मिळाव्यात आणि त्यांच्या विविध समस्या निराकरण कामी रेल्वे विभाग आणि प्रवाशी यांच्यात दुवा म्हणून रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्टेशन सल्लागार समिती गठीत करीत असते. 



यासाठी स्थानिक खासदार हे समिती सदस्यांची नावांची शिफारस करीत असतात. त्यानुसार शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेस्थानक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये रेल्वे बोर्डाचे सदस्य तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या शिफारशी नंतर शेगाव शहरातील विविध क्षेत्रांमधील एकूण दहा सदस्यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 


यामध्ये गोपाल गीते, राजेश अग्रवाल, ॲड. पुरूषोत्तम डांगर, मिनाक्षी बुरूंगले, संजय त्रिवेदी, राजू सुरवाडे, पत्रकार फहीम देशमुख, डॉ.प्रदिप गायकवाड, प्रदिप गटमने, मुकुंदा खेडकर यांचा समावेश करण्यात आलेला आहे.



 

रेल्वेचे डीआरयुसीसी मेंबर तथा शेगावचे नगरसेवक दिनेश शिंदे यांनी सूचविलेल्या नावावरून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी रेल्वे सल्लगार समितीवर सदस्यांच्या नावांची शिफारस केली होती. त्यानुसार नुकतीच भुसावळ रेल्वे मंडळाच्या वाणिज्य विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्र जाहीर केले आहे.

टिप्पण्या