S. T. Employees- Akola-court order: एस. टी.अकोला आगार क्रमांक 2 चे बडतर्फ कर्मचारी अखेर न्यायालयाच्या आदेशाने कामावर रुजू



                       


भारतीय अलंकार 24

अकोला: पाच महिन्यापासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अकोला आगारातील अनेक कर्मचारी यांच्यावर विविध कारवाया करण्यात आल्या होत्या .त्यात प्रामुख्याने बदली, निलंबन, कारणे दाखवा नोटीस व बडतर्फ करणे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिनांक 22:एप्रिल 2022 पर्यंत बडतर्फ कर्मचाऱ्यांना सोडून बाकी कारवाया मागे घेऊन कामावर रुजू करून घेतले होते. परंतु बडतर्फ कर्मचाऱ्यांना d c.अपील करायला सांगण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी सर्व बडतर्फ कर्मचाऱ्यांनी d.c. अपिल केले होते. त्यांना दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाच्या आदेशावरून d.c .अकोला यांनी बडतर्फी ची शिक्षा मागे घेऊन सक्त ताकीद देऊन आगार प्रमुखांना सदर कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आगारात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी बडतर्फ असलेले कर्मचाऱ्यांचे ढोल ताशे,पेढे वाटून, पुष्प हाराने, स्वागत करून रुजू करण्यासाठी वाजत गाजत घेऊन गेले.



यामधे इंदिरा मुकुंदे, सौ.ढगे, सुषमा शेगोकर, कविता पडसपगार ,शेख मुझाहिद,एस,एम. चक्रनारायण,शाम दुबे, विनय बोदडे ,समीर अली, c.g . इंगळे, अल्ताफ शहा, अनवर मिर्जा, इर्शाद खान, d.d टाले, किशोर देशमुख, विजय मेहसरे, प्रशांत सप्रे, दीपक पवार, शेख झाकीर, राहुल पवार, राजू गोगे, हरिष आंग्रे, राजू पळसपगार ,इम्रान t.c., अरुण कटोले,चंदु भोसले, अरुण रूम हे कर्मचारी रुजू झाले. 



कर्मचाऱ्यांचे स्वागत देवेंद्र पवार,संध्या शेरेकर, गणेश डांगे, एस.बी. डांगे, संतोष राठोड, सचिन हातडकर, एम.आर. देशमुख, तेजू नेरकर,राजेश राऊत यांनी केले.


टिप्पण्या