rising-temperature-school-akola: वाढते तापमानःइयत्ता पहिले ते सातवीचे वर्ग सकाळी साडेअकरा पर्यंत -जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

                                          file image




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.12: जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेले तापमान आणि त्याचा विद्यार्थ्यांचा तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील इयत्ता पहिले ते सातवीच्या सर्व शाळांची वेळ दि.18 पासून सकाळी सात ते साडेअकरा अशी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत.


या आदेशात म्हटल्यानुसार, जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, तसेच ग्रामीण भागातील तसेच सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या खाजगी, शासकीय, निमशासकीय शाळांची वेळ दि.18 पासून सकाळी सात ते साडे अकरा अशी करण्यात आली आहे. तापमानाची तीव्रता लक्षात घेता शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय योजावेत. मनपा आयुक्त, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिनस्त शाळांमध्ये आवश्यक ते नियोजन करावे,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या