Ramadan 2022: रमजानचा चंद्र दिसला; आज पहिला उपवास, तरावीहच्या विशेष प्रार्थनेसाठी दोन वेळा निश्चित




ॲड नीलिमा शिंगणे जगड

अकोला : रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  शनिवारी सायंकाळी मगरीबच्या नमाजानंतर रमजानचा चंद्र पाहण्यासाठी लोक बेचैन झाले होते, मगरीबची नमाज अदा झाल्यानंतर चंद्राचे दर्शन झाले. शनिवारी रात्री उशिरा ईशाच्या नमाजानंतर विशेष तरावीहची नमाज अदा करण्यात आली. आणि आज रविवारपासून पहिला उपवास (पहला रोजा) ठेवण्यात आला.



बाजारपेठ सजली


माह-ए-रमजानला सुरुवात झाल्याने मशिदी आणि घराघरांतून तयारी जोरात सुरू झाली आहे.  चौकाचौकात खजूर, ड्राय फूट, फळे, नान आदींची दुकाने सजली. सेहरी आणि इफ्तारसाठी बाजारपेठांमध्ये दुकाने सजली आहेत. दोन वर्षापासून कोरोना निर्बंध मुळे मोहम्मद अली रोड वर पारंपरिक रमजान मेळा भरला नव्हता.आता शासनाने निर्बंध मागे घेतले असल्याने यंदा रमजान विशेष बाजार पूर्वी प्रमाणेच महिनाभर सुरू राहणार आहे.



घरांची सजावट


पवित्र रमजान महिन्याचे स्वागत करण्यासाठी महिला वर्गाने आपल्या घराची साफसफाई करून सजावट केली आहे. रमजान महिन्यातील विशेष खाद्य पदार्थ तयार करण्यास घरोघरी लगबग सुरू झाली आहे. 




विशेष नमाज


अकोल्यातील कच्छी मस्जिदमध्ये तरावीहच्या विशेष नमाजासाठी दोन वेळा निश्चित करण्यात आल्या असून, पहिली वेळ ईशाची जमाअत 8-45 वाजता आणि तरावीहची जमाअत 9 वाजता असेल, त्याचप्रमाणे दुसरी ईशाची जमाअत 10-30 आणि तरावीहची जमाअत 10-45 ला असेल.

टिप्पण्या