political-news-kirit-Somaiya-akola-shiv-sainiks: किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - अकोला शिवसैनिकांची मागणी





नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर तमाम शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेतील नेते प्रत्येक वेळी एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोळा केलेल्या 58 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आता राऊतांनी केला आहे.




जोरदार निदर्शने




सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरली आहे. अकोल्यात शिवसेने तर्फे आज स्थनिक पोस्ट ऑफिस चौकात किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक शिव सैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या चित्रावर काळा रंग फासून जोरदार निदर्शने देत नारेबाजी केली. 



शिवसेना अकोला शहर व जिल्ह्याच्या वतीने संपर्क प्रमुख  प्रकाश शिरवाडकर यांच्या आदेशाने व जिल्हाप्रमुख तथा आमदार नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले.




भाजपाचे किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये आय एन एस विंक्रातच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा करुन देशाशी गद्दारी केली आहे,असा आरोप अकोला शिवसेनाने करून, सोमय्या यांच्या विरोधात सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत तुरुंगात टाकण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यानी यावेळी केली.  




यांचा सहभाग 



माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर, विजय मालोकार, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरुमकार,शहरप्रमुख अतुल पवनीकर,शहर संघटक संतोष अनासाने, राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, तरुण बगेरे, नगरसेवक मंगेश काळे, शशी चोपडे, प्रदीप गुरुखुद्दे, उपशहर प्रमुख राजेश वगारे , गजानन बोराडे, अविनाश मोरे, प्रकाश वानखडे, नंदू ढाकरे, पप्पू चौधरी, विशाल कपले, सूर्यकांत भरकर, सुरेंद्र विसपुते, बंडू सवई, दिनेश सरोदे, अभिषेक खरसाडे, पंकज भोंडे, संदीप पत्की, विलास मुंडोकर, नितीन थळकर, अनिल परचुरे, सतिश वानरे, गोपाल बिल्लेवार,  मंगेश खंडेझोड, सुनिल दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी, रोशन राज, नितीन ताथोड ,संजय भांबेरे, निलेश काळे, गणेश चौधरी, दिपक मराठे, मुन्ना ठाकूर, अभय खुमकर, जय पाटील, अक्षय नागपुरे, मुन्ना चव्हाण, पप्पु कवले, शशी भोसले, अर्जुन क्षीरसागर, जोस्त्ना चोरे ,देवश्री ठाकरे, निलिमा तिजारे, सूनिता श्रीवास, वर्षा पीसोडे आदीं शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.





टिप्पण्या