अकोला: युवासेनेचे पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात थाळी बजाव आंदोलन
ॲड नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: वाढती महागाई आणि सातत्याने पेट्रोल डिझेल दरवाढच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत 'थाली बजाओ, खुशीया मनाओ' आंदोलन आज युवासेनेच्या वतीने करण्यात आले.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.
अकोला (विदर्भ) येथे युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील, उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, महानगर प्रमुख नितीन मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी यात सहभाग घेतला. वजीफदार पेट्रोल पंप अशोक वाटीका चौक येथे थाळ्या वाजवून केंद्र सरकारचं अभिनंदन करत अनोख्या पद्धतीने निषेध महागाई , दरवाढीचा निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे महाविकास आघाडी सरकार सीएनजी गॅसचे दर कमी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत; तर केंद्र सरकार मात्र महागाई वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचं पाप करत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यातील निवडणुका होईपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले. अन निकाल लागताच दररोज भाववाढ चालू ठेवली आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या जनतेला केंद्र सरकार संकटाच्या खाईत लोटत आहे, अशी टिका यावेळी विठ्ठल सरप यांनी केली.
थेट पेट्रोल पंप ठिकाणी केलेल्या या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा झाली.
यांचा सहभाग
यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील, दीपक बोचरे यांच्या सह योगेश बुंदेले उप जिल्हाप्रमुख,नितीन मिश्रा महानगर प्रमुख, अभिजित मुळे सचिव, आस्तिक चव्हाण - तालुका प्रमुख, सौरभ नागोशे - कॉलेज कक्ष प्रमुख,अक्षय नागपुरे उपशहर प्रमुख,कृष्णा बगेरे उपशहर प्रमुख, राम गावंडे उपशहर प्रमुख, युवती सेनेच्या नंदिनी पाटीलखेडे ,ख़ुशी भटकर सह अनेक शिवसैनिक व नागरिकानी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा