onion-fire-field-keliveli-dahihanda police: केळीवेळी येथे एका शेतात कांद्याच्या जवनला आग; 70 ते 80 क्विंटल कांदा जळून खाक

अकोला: keliveli गावात कांद्याच्या जवणला आग (फोटो: गणेश सरदार)



गणेश सरदार

अकोला: केळीवेळी येथे एका शेतात कांद्याच्या जवनला शुक्रवारी सायंकाळी आग लागून जवळपास 70 ते 80  क्विंटल कांदा जळून खाक झाल्याची घटना घडली. 


याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दि.15.04.22 ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कांद्याच्या जवनला आग लागली. संजय बदरखे यांच्या शेतात दीड एकर कांदा पेरलेला होता. हा कांदा उपटून त्याची जवन लावली. जवन लावल्यावर एकवीस दिवस ठेवावे लागते. कांदा उपटून 17 दिवस झालेले होते. मात्र, 15 एप्रिल रोजी सायंकाळी बदरखे यांच्या शेतात अचानक आग लागली.आणि गावात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की, गावातही आगीचे लोळ दिसत होते. गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर शेत आहे.


घटनेची माहिती मिळताच गावातल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी प्रचंड होती की, गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न कमी पडले. गावकऱ्यांना आग विजविता आली नाही. दरम्यान सर्व गंजी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये जवळपास सत्तर ते एंशी क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. 


संजय बदरखे यांनी घटनेची रितसर माहिती दहीहंडा पोलिस स्टेशनला दिली असून, पुढील तपास दहीहंडा पोलीस करत आहे.

टिप्पण्या