inauguration-open stage-auditorium: 80 वर्षे जुने असलेल्या वटवृक्षाभोवती उभारलेल्या ‘समवसारण’ या खुले रंगमंच व प्रेक्षागृहाचे पुण्यात उद्‌घाटन

समवसारण’ या खूल्या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन 




पुणे: पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘समवसारण’ या खूल्या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरूवार 14 एप्रिल रोजी झाले. 





प्राच्य विद्येचे संशोधन अधिक लोकाभिमुख होण्याची गरज 



यावेळी गडकरी म्हणाले की, प्राच्य विद्येचे संशोधन कधीच कालबाह्य होत नाही मात्र त्यासाठी ते अधिक लोकाभिमुख होण्याची गरज असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. इथल्या संशोधनातून मिळणारे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  ज्येष्ठ उद्योगपती अभयकुमार फिरोदिया  होते. 



80 वर्षे जुने असलेल्या वटवृक्षाभोवती खुले रंगमंच 



भांडारकर संस्थेच्या प्रांगणात सुमारे 80 वर्षे जुने असलेल्या वटवृक्षाभोवती हे खुले रंगमंच व प्रेक्षागृह  फिरोदीया ट्रस्टने संस्थेकरिता दिलेल्या देणगीतून उभारण्यात आले आहे. सुमारे दीड हजार प्रेक्षक बसू शकतील इतकी आसऩक्षमता असलेल्या या भव्य ॲम्फी थिएटरचे समवसरण असे नामकरण करण्यात आले आहे. 



टिप्पण्या