- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि.11: गंगानगर परिसरातील सालासार बालाजी मंदिरात हनुमंत जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाचा प्रारंभ 2 एप्रिल पासून रामचरितमानसच्या नवान्ह पारायणने झाला असून, रामनवमी पर्यंत पारायण झाले असल्याची माहिती सालासार बालाजी सेवा समितीचे पदाधिकारी यांनी दिली.
सोमवारी मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत उत्सवाची माहिती देण्यात आली.
भजन संध्या आणि सामूहिक सुंदरकांड पाठ
यामध्ये बुधवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता भजन गायक गोपाल शर्मा हारे याची भजन संध्या सालासर बालाजी मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावात होणार आहे. त्यानंतर गुरुवार 14 एप्रिल रोजी सायं 7 वाजता भजनकार भागवताचार्य उमेश शर्मा डब्युजी यांची भजन संध्या होणार आहे. शुक्रवार 15 एप्रिल रोजी सायं 7 वाजता सालासार सत्संग मंडळाच्या वतीने सामूहिक श्री सुंदरकांड पाठ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जन्मोत्सव सोहळा शनिवारी
हनुमंत जन्मोत्सव शनिवार 15 एप्रिल रोजी होत असून सकाळी 5.30 वाजता पासून हा जन्मोत्सव विविध उपक्रमाने रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर परिसरात सुरू राहणार आहे. उत्सवाची जय्यत तयारी सेवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
भक्तांचे श्रद्धास्थान
भक्ताचे श्रद्धास्थान असणारे गंगा नगर बायपास येथील श्री सालासर बालाजी मंदिर हे मोठे मंदिर असून, यामध्ये अनेक देव देवताची प्रतिमा विराजमान आहे. या परिसरात सातत्याने सुंदरकाड, भजन संध्या व विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असून यामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिति राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाविकांना आवाहन
दोन वर्षापासून कोरोनामुळे कोणताही मंदिरात मोठा उत्सवाचे आयोजन झाले नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध मागे घेतल्याने, नव्या उत्साहात सेवा समिती हनुमंत जन्म उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविणार आहे. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे असे आवाहन पदाधिकऱ्यांनी यावेळी केले..
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा