drama-award-ceremony-akola:यंदाचा नाट्य तपस्वी पुरस्काराचे मानकरी नेपथ्यकार शाम उमरेकर; सोमवारी राम जाधव नाट्यतपस्वी पुरस्कार सोहळा






ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: अनेक वर्षांपासून प्रसिद्धीचा आव न आणता इमाने इतबारे रंगभूमीची हौशी नाट्याच्या माध्यमातून सुरेख नेपथ्य सांभाळून रंगभूमीची अहर्निश सेवा करणारे जेष्ठ नेपथ्यकार शाम उमरेकर यांना यावर्षीचा राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.


स्थानीय शासकीय विश्रामगृहात सहयाद्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत "रंगकर्मी राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022 "सोहळ्याची माहिती देण्यात आली. 



या वर्षी पासून सहयाद्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हौशी रंगभूमीत आपले आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील जेष्ठ रंगकर्मीस "राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार" देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व रोख रक्कम हे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. 


जिल्ह्यातील हौशी रंगभूमीचे भीष्म, 91 व्या अ भा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, राज्य शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य स्व राम जाधव यांच्या नावाने प्रस्तुत पुरस्कार देण्यात येणार आहे. सोमवार दि 4 एप्रिल रोजी साय 7 वाजता स्थानीय नवनिर्मित सांस्कृतिक भवन प्रांगण,जुने दिवेकर क्रीडा संकुल, रामदास पेठ येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



जेष्ठ साहित्यीक विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्यात कृतज्ञेचे मानकरी पालकमंत्री ना बच्चू कडू,आ.रणधीर सावरकर उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, आयएफएस अधिकारी प्रशांत राम जाधव, आमदार गोवर्धन शर्मा ,माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आ तुकाराम बिरकड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



या सोहळ्यात चित्रपट दिग्दर्शक व लेखक प्रा निलेश जळमकर हे  या सदरात "मि बच्चू कडू बोलतोय....संवाद जिव्हाळ्याचा"  यावर पालकमंत्री बच्चु कडू यांची प्रकट मुलाखत घेऊन कलावंत व साहित्यीकां सोबत मुक्त संवाद साधणार आहेत. 



या सोहळ्याच्या सफलतेसाठी  पुरस्कार निवड समिती, मार्गदर्शक समिती, स्वागत समिती, निमंत्रण समिती, व्यवस्थापन समिती, व्यासपीठ समिती, सृजन व तंत्रज्ञ समिती, प्रसिद्धी आदी समिती गठीत करण्यात आल्या आहेत. 



पुरस्कार निवड समितीत तुकाराम बिरकड, गजानन नारे, पुरुषोत्तम आवारे, डॉ अशोक देशमुख, दिलीप देशपांडे, वंदना मोरे,धनंजय मिश्रा, अभिजित परांजपे कामकाज बघणार आहेत, तर मार्गदर्शन समितीत जेष्ठ रंगकर्मी मधू जाधव, एड अनंत खेळकर, रमेश थोरात, डॉ रावसाहेब काळे, पुष्पराज गावंडे, डॉ आशा मिरगे, सुधाकर गीते, शत्रूधन बिरकड, शशिकांत जोशी, शाहीर वसंत मानवटकर आदी कामकाज बघणार आहेत.



महानगरातील सर्व क्षेत्रातील कलावंत व साहित्यिकांनी नाट्यगृह निर्मिती कृतज्ञता सोहळा व राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार सोहळ्यात होणार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



या पत्रकार परिषदेत यावेळी जेष्ठ रंगकर्मी मधू जाधव, तुकाराम बिरकड, गजानन नारे, पुरुषोत्तम आवारे, विद्या बनाफर, निलेश कवळे, मेघा चिकार, मयुरी लकडे, अनंत खेळकर, सहयाद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा निलेश जळमकर, समन्वयक प्रफुल कानकिरड, अमोल ताले, व्यवस्थापन सचिन गिरी आदी समिती पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या