chagan-bhujbal-akola-city-visit-ed: केंद्र सरकारच्या चुका लपविण्यासाठी ईडीच्या कारवाई- ना. छगन भुजबळ





नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: केंद्र सरकारच्या चुका लपविण्यासाठी ईडीच्या कारवाई केल्या जात आहे. भाजपच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर ईडीची कारवाई करण्यात येते,असा आरोप नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.


ते अकोला (विदर्भ) येथे आज एका लग्न सोहळासाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.


ईडीचा कायदा रद्द करण्याची मागणी देखील. छगन भुजबळ यांनी केली. तर भाजप ईडी कायद्याचा मोठा दुरुपयोग करत असल्याचा आरोप देखिल भुजबळ त्यांनी केला. 



ईडी भाजपच्या नेत्याने सांगितल्या शिवाय कारवाईला जात नाही, असे असा आरोप करीत भुजबळ यांनी  ईडीचा हा  कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.


शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदासाठी दिल्लीचे नेते ठरवतील,असे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात भुजबळ यांनी स्पष्ट केले.








अकोला विमानतळावर आगमन व स्वागत




            

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांचे आज दुपारी अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी डॉ. निलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, तहसिलदार सुनिल पाटील, राहुल तायडे, संतोष सिंदे आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. स्वागतानंतर ना. छगन भुजबळ हे  पूर्वनियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले.



शिव भोजन थाळीच्या अनुदानात वाढ करा 



महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे अनिल मालगे यांची मागणी



महाराष्ट्रातील आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळी च्या अनुदानात वाढ करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज शिवनी येथील विमानतळावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांना शिवभोजन संघटना अकोला जिल्ह्याच्या जिल्हा सचिव अनिल मालगे  यांनी माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात दिले. 


यावेळी माजी आमदार तुकाराम बिडकर,  माजी आमदार दाळू गुरुजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश सांवल उपस्थित होते.

 



महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या शिवभोजन थाळी मध्ये शिव भोजन थाळी ही मागील दोन वर्षापासून सुरू आहे. यामध्ये दोन वर्षे अगोदर अन्नधान्याचे असलेले भाव व आज चे भाव यामध्ये खूप मोठी तफावत झाल्याचे दिसत आहे. आज सिलेंडरचे भाव एक हजाराच्या वर गेल्याने अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दोन वर्षे अगोदर सुरू झालेल्या शिवपूजन थाळीच्या अनुदानामध्ये  शासनाने तत्काळ शिव भोजन थाळीच्या अनुदानामध्ये वाढ करावी या आशयाचे निवेदन आज शिवभोजन संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा सचिव अनिल मालगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे अकोला येथील दौऱ्यानिमित्त आले असता शिवणी विमानतळ येथे त्यांना निवेदन देण्यात आले. 



याविषयी मी लवकरच निर्णय घेईल असे आश्वासन प्रा. तुकाराम बिरकड अनिल मालगे यांना ना. भुजबळ यांनी दिले.



टिप्पण्या