By-Election 2022-Gram Panchayat: ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर: अकोला जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक




अकोला दि.30: राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, निधन,राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्‍हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्‍यातील एकूण 125 ग्रामपंचायतीमधील 207 रिक्‍तपदाच्‍या पोट निवडणूका घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.



तालुका, ग्रामपंचायतीची संख्‍या, रिक्‍त पदाची संख्‍या अनुक्रमे


तेल्‍हारा 06 - 09,अकोट 22 - 49, मुर्तिजापूर 35 - 61,अकोला 21 - 29,बाळापूर 12 - 16, बार्शिटाकळी 20 -32, पातूर 09 -11. एकूण 125-207.


आचारसंहिता 

निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुक कार्यक्रम लागल्‍यापासुन आचारसंहिता लागू झाली असून;आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्‍तित्‍वात राहील.  



असा आहे कार्यक्रम 


तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्‍याचा 5 मे 2022 असुन नामनिर्देशनपत्र भरण्‍याची प्रक्रिया  13 मे पासुन सुरु होणार आहे.  20 मे पर्यंत उमेदवारांना उपरोक्‍त कालावधीत 14, 15 व 16 मे रोजीचे सार्वत्रिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत नाम निर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे छानणी करण्‍याचा दि. 23 मे असुन दि. 25  मे  दुपारी तीन वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. तसेच निवडणुक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच  25  मे दुपारी तीन वाजेनंतर अंतिमरित्‍या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्‍यात येणार असुन आवश्‍यक असल्‍यास मतदान 5 जुन  रोजी सकाळी साडेसात वाजेपासुन ते सायं साडेपाच वा. पर्यंत होणार आहे. मतमोजणीचा दि. 6 जून असुन जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्‍याचा अंतिम दिनांक 9 जून आहे.


 

मतदार यादी कार्यक्रम 


अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्‍त पदांच्‍या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम नुसार दि.28 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी सर्व संबंधित तहसिलदार यांनी प्रसिद्ध केली आहे.


कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेण्‍याचा अंतिम दि.28 एप्रिल ते दि.4 मे पर्यंत असुन आक्षेप व हरकती संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्‍यात येतील. त्‍यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. 5 मे रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.


टिप्पण्या