Women's-Day-Homeguard-office: अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा






संगिता इंगळे

अकोला: जिल्हा होमगार्ड कार्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा होमगार्ड समादेशक,तथा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.मोनिका राऊत  होत्या.

प्र.केंद्र नायक संतोष कुमार जयस्वाल, प्र.प्रशासकीय अधिकारी राजेश मुळे,व राजू खडसे यांनी जिल्हा समादेशक डॉ.मोनिका राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 



मोनिका राऊत यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.अकोला जिल्ह्यातील सर्व पथकातील महिला/पुरुष सैनिकांची बंदोबस्त,कर्तव्या बाबत प्रशंशा केली. तसेच होमगार्ड विभागातील समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यतत्पर असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसा पूर्वी जगभरात कोणाचे संसर्ग असल्यामुळे धार्मिक सण उत्सवावर विर्जण पडले होते. सध्या कोरोना नियमांमध्ये शिथिलता ठेवण्यात आली असुन. त्यामुळे 8 मार्च रोजी महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला. 




जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पातुर तालुका समादेशक संगिता इंगळे, गंगा उजगरे, मंजुषा चांदवडकर, किरण वानखडे, शहनाज अंजुम, रविना अंभोरे, जयश्री कावरे,दिपाली कपले, जिजा उमाळे, हिवराळे या महिलांना जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 




या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील पातुर, बाळापुर, अकोट,अकोला, मुर्तीजापुर ह्या तालुक्यातील महिलांनी उपस्थिती दर्शविली. जागतिक महिला दिन या कार्यक्रमाचे आयोजन अकोला जिल्हा प्रभारी केंद्र नायक संतोषकुमार जयस्वाल प्र.प्रशासकीय अधिकारी राजेश मुळे, प्रभारी पलटण नायक बालक डोंगर,अकोला तालुका समादेशक राजू खडसे यांनी आयोजन केले. 



कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पातुर तालुका समादेशक संगीता इंगळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन अकोला पथकातील महिला होमगार्ड शहनाज अंजुम यांनी केले. या कार्यक्रमामध्ये अकोला पथकातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



टिप्पण्या