the-kashmir-files-tax-free-demand: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट करमुक्त करण्यात यावा; श्रीराम नवमी शोभायात्रा समितीची मागणी

निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदन सोपविताना आमदार गोवर्धन शर्मा व समितीचे पदाधिकारी.





नीलिमा शिंगणे जगड

अकोला:  'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे, अशी आग्रही मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीने केली आहे. यासंदर्भात अकोल्यातील 25000 नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात पाठवण्यात आले.  निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांना या मागणीचे निवेदन आज सादर करण्यात आले.


सर्वसामान्यांना हा सिनेमा पाहता यावा


काश्मीरमध्ये हिंदूवर झालेला अन्याय अत्याचार संदर्भात वास्तव्य सिनेमात आशुतोष अग्रवाल व विवेक अग्निहोत्री यांनी सादरीकरण केले आहे. यासाठी द कश्मिर फाईल्स तसेच पावन खिंड सिनेमाला सुद्धा कर सूट देण्यात यावी,असे निवेदनात नमूद आहे. सर्वसामान्यांना हा सिनेमा पाहता यावा यासाठी देशातील दहा राज्यांनी सवलती दिल्या. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा व समितीचे अध्यक्ष गजानन दाळू गुरुजी यांनी केली.




याप्रसंगी विलास अनासने, ब्रिजमोहन चीतलांगे, अशोक गुप्ता, अनिल मानधने, गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, नितीन जोशी, अजय पांडे, पुष्पा वानखडे, चित्रा बापट, रेखा नालट, मनीषा भुसारी , संतोषी शर्मा, कल्पना अडचुले, पद्मा अडचुले, वैशाली सावजी, गीतांजली शेगोकार, शितल गिरी, सोनल शर्मा, मालती रणपिसे, दुर्गा जोशी, नवीन गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या