sub-junior-state-chess-tournament: संस्कृती वानखडे व आयुष महाजनचे स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व; सब ज्युनिअर राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा शानदार समारोप

बुद्धिबळातील चेकमेट स्ट्रॅटेजीचा उपयोग बाल स्पर्धकांसाठी जीवनात उपयोगी


                     संस्कृती वानखेडे 


 


ॲड. नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: 16 वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत 1576 अंक प्राप्त करून संस्कृती वानखडे या अकोल्यातील  स्पर्धक मुलीने प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये 1740 अंक प्राप्त करणारा कोल्हापूर येथील आयुष महाजन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्थेतुन महाराष्ट्राचा संघ निवडला गेला. निवड झालेला संघ दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.



बुद्धिबळातील चेकमेट हा परवलीचा शब्द बाल विद्यार्थी व स्पर्धकांसाठी जीवनात अत्यंत महत्त्वाचा असून बुद्धिबळमुळे बुद्धी तल्लख व ऊर्जावान होते. मैदानी खेळा समवेत अशा खेळांचा ही सातत्याने ग्रामीण व्यवस्थेत उपयोग वाढला पाहिजे व ग्रामीण भागातील स्पर्धकांनी अशा उपक्रमात सहभागी घेऊन आपल्या बुद्धीला वाव दिला पाहीजे यासाठी बाजार समितीचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.



कृषी उत्पन्न बाजार समिती व महानगर बुद्धिबळ असो च्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात लोकनेते स्व वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त गत चार दिवसापासून  सुरू असलेल्या राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धेचा सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाने समारोप करण्यात आला.



आमदार अमोल मिटकरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या पारितोषिक वितरण व समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते डॉ संतोष कुमार कोरपे,डॉ सुभाषचंद्र कोरपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महाराष्ट्र चेस असो चे कोषाध्यक्ष हाजी फारुक शेख, जिल्हा उपनिबंधक विनायकराव काळे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, महानगर चेस असो चे अध्यक्ष संदीप पुंडकर,बाजार समितीचे उपसभापती निळकंठराव खेडकर,असो चे सचिव जितेंद्र अग्रवाल, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 





यावेळी स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रवीण ठाकरे यांनी चार दिवसापासून सहभागी असणाऱ्या स्पर्धक विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.16 वर्षाखालील वयोगटात संपन्न झालेल्या या चाचणी स्पर्धेत 1576 अंक प्राप्त करून संस्कृती वानखडे या अकोल्यातील  स्पर्धक मुलीने प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये 1740 अंक प्राप्त करणारा कोल्हापूर येथील आयुष महाजन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विजेत्यांना तीन हजार रुपये रोख व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.


यात सर्वोच्च अंक प्राप्त करणाऱ्या मुलींमधील पहिल्या दहा धनश्री खैरमोडे पुणे, देवांशी सोळंकी पालघर, श्रद्धा बजाज नागपुर, गौरी स्वारसत ठाणे, वेदिका पाल नागपुर, अनाईशा नाहर मुंबई, देवांशी गावंडे अकोला, सिया कुलकर्णी नाशिक, लावण्या कोष्टी चंद्रपूर यांना रोख पसरितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह ने सन्मानित करण्यात आले. 



मुलांमधून पहिले दहा आलेले कुशाग्र जैन पुणे, सक्षम सिंग नागपुर,अरविंद आयर ठाणे,अक्षय बोरगावकर पुणे, भूमीनाथन ललित पुणे, निलय कुलकर्णी नागपूर, श्लोक चांद्राणी अकोला, शिवराज पिंगळे पुणे,आकाश मगाई सोलापूर आदींना यावेळी रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 






स्पर्धांचे आयोजन हे दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गायवाडा हॉल येथे करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 140 खेळाडूंनी  सहभाग नोंदवला होता. 30 हजार रुपयांची रोख पारितोषिके व चषक देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले.

  



विविध वयोगटातील विजेते 



१० वर्ष वयोगट मुले

शौनक बडोले नागपूर, ऋत्विक शिंदे नंदुरबार, प्रसन्न शिरपूरकर अमरावती,


मुली

अन्वी हिरडे नागपूर, व  रित शर्मा अकोला.


८ वर्ष वयोगट मुले


पर्व हकानी मुंबई,

आरव तिरपुडे अकोला,

अंशुल वांगे अकोला,



मुली

देवांशी योगेंद्र गावंडे औरंगाबाद,

नारायणी उमेश मराठे नंदुरबार,

निशिता नरेंद्र कळस्कर अकोला,




राष्ट्रीय स्पर्धे साठी पात्र




स्पर्धेतील मुलांमधील प्रथम चार क्रमांकाचे खेळाडू व मुलींमधील पहिल्या नऊ खेळाडू यांची निवड दिल्ली येथे दिनांक चार ते आठ मार्च दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.





पारितोषिक वितरण कार्यक्रमात दहा वर्षातील, आठ वर्षाखालील बाल स्पर्धकांनाही विविध पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत विजेत्यांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. तर पराभूत झालेल्या स्पर्धकांनी नव्या जोम व नव्या उमेदीने पूर्ण तयारी करून अशा स्पर्धात सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी पालकांच्या वतीने जयंत पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अशा अभिनव स्पर्धेचे कौतुक केले. 




या आयोजनात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.माहेश्वरी भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक रमेशचंद्र चांडक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच आरबीटर प्रविण ठाकरे जलगाव, विवेक  सोहनी रत्नागिरी, विकास भावे बदलापुर,जयश्री डागचे ठाणे,अमित कदम अलीबाग, श्रेयस पाटील अलीबाग यांना ही सन्मानित करण्यात आले.




आपल्या समारोपीय मनोगतात शिरीष धोत्रे यांनी या उपक्रमाची माहिती देत पहिल्याच अशा उपक्रमाला राज्यभरातील स्पर्धकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे नव्या उमेदीने बाजार समिती अशा उपक्रमात सातत्याने सहभागी होणार असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले. संचालन प्रा मोहन खडसे तथा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर यांनी, स्पर्धा संचालन मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांनी, तर आभार प्रदर्शन उपसभापती निळकंठ खेडकर यांनी मानले.



यावेळी प्रभूजितसिंह बछेर,बाजार समिती  संचालक प्रकाशराव काले, सुनील परनाटे, गजाननराव पुंडकर,रमेशचंद्र चांडक,सुरेश सोळंके, ज्ञानेश्वर महल्ले, अभिमन्यू वकटे, मुकेश मुरूमकार, चंद्रशेखर खेडकर, रश्मीताई अवचार, बाबुराव गावंडे, विठ्ठलराव चतरकर, विद्याताई गावंडे, प्रमोद लाखे, सुनील मालोकर, राजेश बेले, देवेंद्र देवरे, वर्षाताई गावंडे,चंदू चौधरी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या