street lights-water supply-msedcl: पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनेचे 5 कोटी 68 लाख थकले: वसुलीसाठी महावितरण आग्रही



                                            file photo


 

अकोला, दि. २४ मार्च : महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथ दिव्यांच्या जोडणीचे ५ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने ही रक्कम वसूल करण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत.



महावितरण देखील वीज निर्मिती आणि पारेषण कंपनीची ग्राहक आहे. निर्मिती कंपनीला वीज खरेदीसाठी आणि पारेषण कंपनीला वीज वाहून आणण्यासाठी महावितरणला पैसे मोजावे लागतात. याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.



अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या ७६८ वीज जोडण्या असून थकबाकी १६ लाख ७१ हजार रुपये आहे. पथदिव्यांच्या १३२४ वीज जोडण्या असून थकबाकी ९१ लाख ८५ हजार रुपये आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पथदिव्यांच्या १७९५ वीज जोडण्या असून थकबाकी २ कोटी ६४ लाख रुपये आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या १४३९ वीज जोडण्या असून थकबाकी ७७ लाख ५६ हजार रुपये आहे. 



वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या ४५७ वीज जोडण्या असून १२ लाख ८९ हजार रुपये थकबाकी आहे. पथदिव्यांच्या ८७४ जोडण्या असून थकबाकी ९९ लाख ७१ हजार रुपये आहे.



थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध पथक तयार केले आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी ही रक्कम वसूल व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.महावितरणच्या या प्रयत्नांना यश मिळते आहे. नगर परिषद, ग्राम पंचायत शिल्लक रक्कम भरून सहकार्य करीत आहे.

टिप्पण्या