shivsena-akola city- flood victims: पूरपिडीतांच्या मागणी करीता सरसावली शिवसेना…




ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: अतिवृष्टीमुळे 21 जुलै 2021 नुकसान झालेल्या पूरपीडीत लोकांना  शासनाच्या मदतीची आस लागून बसली आहे.

पात्रता यादीत पात्र असुन व राज्य शासनाने निधी पाठवला असताना सुद्धा  कर्मचारी अधिकारी वर्गाकडे वाटप करण्यासाठी वेळ नाही, पूरग्रस्तांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात.



मात्र सानुग्रह मदतीपासून अद्याप वंचित असलेल्या अकोला शहरातील अतिवृष्टी ग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागनी करीता शहर प्रमुख अतुल पवनीकर व विशाल कपले यांच्या नेतुत्वमध्ये तहसील कार्यालय येथे  आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.



जो पर्यंत चेक मिळणार नाही तो पर्यत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, या मागणीवर शिवसेना तठस्थ भूमिकेवर ठाम होती शिवसेनेची आदोलनाची तिव्र  धार बघता  शिवसैनिकाना व पात्र असलेल्या लाभार्थी वर्गाला तहसीलदार साहेबांनी लेखी स्वरूपात 9 तारखे पर्यंत चेक वितरित करणार असे हमी पत्र दिले.





या वेळी महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, कामगार सेनेचे विजय मालोकार, शुभांगी किनगे, नीलिमा तिजारे, सुनीता श्रीवास,सीमा मोकळकर, संगीता मराठे  नगर सेवक शशी चोपडे, मंगेश काळे, गजानन बोराळे, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल,प्रकाश  वानखडे, राजु वगारे, पप्पू चोधरी, गोटू अग्रवाल, नंदकिशोर ढाकरे, मुन्ना ठाकूर,अभय खुमकर, मंगेश खंडेझोड, श्यामभाऊ रेडे, सुनील दुर्गीयां, रमेश गायकवाड, रोहित खंडारे, माधव गावंडे, आकाश सुर्यवंशी, शुभम तायडे, प्रज्वल तायडे, अतुल गावंडे, मनोज ठाकूर, युवराज आसोलकर, गौरव पखान, कृष्णा तराळे,जयेश राऊत, पप्पु बरींगे, विजु ताथोड, शुभम वानखडे सह शिवसैनिक,सखुबाई आठवले मावशी व ताथोड नगर उमरी, व मलकापूर, अकोल्यातील  पुरपीडित महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या