shivjayanti 2022- akola-dabki-road: टाळ मृदुंगाचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकाराने आसमंत निनादला; शिवजयंती निमित शिवव्याख्याते खोडे महाराज यांचे डाबकी रोड परिसरात किर्तन

जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन (छायाचित्र: ॲड.अमोल इंगळे)




ॲड.नीलिमा शिंगणे- जगड

अकाेला : जुने शहरात जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व डाबकी राेड मित्र मंडळच्या वतीने सोमवार 21 मार्च रोजी सायंकाळी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त किर्तनकार, शिवव्याख्याते तथा व्यसनमुक्तीकार हभप मधुकरराव महाराज खोडे यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंगाचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता. शिवप्रेमींनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.




रेणुका नगरस्थित जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साेमवारी सायंकाळी शिवपुजन झाल्यानंतर  किर्तनकार तथा व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खाेडे (इसापुरकर) यांचे किर्तन झाले. 



त्रिसूत्री अंगीकारावी




जेव्हा संताचा आशीर्वाद भक्ताला प्राप्त होतो, तेव्हाच भगवंत प्रसन्न होतात, भगवंत व भक्तांमधील संत हे  दुवा आहेत. देवाची भक्ती, संतांचे विचाराचे आचरण आणि आई वडील यांची सेवा ही त्रिसूत्री शिवाजी महाराजांनी अंगिकारली होती,म्हणूनच ते छत्रपती झालेत. स्वराज संस्थापक झालेत. छत्रपति शिवाजी महाराजांची ही शिकवण आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेचे आहे.तेंव्हाच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्ती होईल,असे यावेळी हभप खोडे महाराज म्हणाले. खाेडे महाराज यांच्या किर्तनाला व शिवपुजनाला शिवभक्त माेठया संख्येने उपस्थित होते. 




सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार




सार्वजनिक समितिच्या वतीने शिवजयंतीचे यंदा 28 वे वर्ष. काेराेनामुळे 2020 व 2021 या  वर्षात अत्यंत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली होती. यंदा मात्र सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कार केला गेला. यामध्ये जॉर्डन येथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप मधे भारताला रौप्य पदक मिळवून देणारी पलक झांबरे, कुस्ती प्रशिक्षक राजेंद्र गोतमारे, कोरोना काळामधे गरजूंना रुग्णांना मदत करणारे डॉक्टर अभय पाटील यांचा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार आशिष गावंडे यांनी मानले. 




मान्यवर उपस्थिती


प्रकाश शिरवाडकर, आमदार नितीन देशमुख, मंजूषा  सावरकर, अर्चना  शर्मा, पुष्पा खंडेलवाल, सुनीता  अग्रवाल, वैशाली शेळके, गीतांजली शेगोकार, सारिका  जयस्वाल, गोपाल  खंडेलवाल, राजेश  मिश्रा, किशोर मांगटे, सतीश ढगे, गजानन पावसाळे,योगिता पावसाळे, मनोज  गायकवाड,सुभाष  म्हसने, राजेश काळे, रवि  गोतमारे,राजू गोतमारे, डॉक्टर अभय पाटील,डॉक्टर शंकरराव वाकुडे, हरिभाऊ दांदळे, अर्चना म्हैसने, चंदा शर्मा, उज्वला देशमुख, सुमन  गावंडे,अजय  शर्मा, तुषार भिरड, हरिभाऊ काळे, विजय इंगळे, गिरीष गोखले, आशिष पवित्रकार, राहुल  देशमुख, डॉक्टर प्रशांत वानखडे, श्रीकांत पिसे,गोपाल दातकर, बबलू  जगताप,अमोल घुगे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.



भव्य शिव दरबार आणि तोरण पताका



शिवजयंती निम्मित जुने शहर डाबकी रोड परिसरात भगवा तोरण पताका ध्वज लावून सजविला होता. रेणुका नगर येथे कार्यक्रम स्थळी उभारलेला भव्य शिव दरबार देखावा आकर्षणाचा बिंदू ठरला.सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेले होते. बाल कीर्तनकार यांनी सादरीकरण करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.





शिवप्रेमींचा हिरमोड


राज्यभरात काेराेनाचा ग्राफ घसरला असला तरी राज्य शासनाने मिरवणुक, रॅलीचे आयोजन करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे निर्देशनुसार यंदाही डाबकी रोड परिसरात शिवजयंतीनिमित्त काढली जाणारी मिरवणूक स्थगित केल्या गेली.त्यामुळे शिवभक्तांचा हिरमोड झाला. 



(सर्व छायाचित्र: ॲड.अमोल इंगळे)




टिप्पण्या