'RRR' movie-vasant talkies-Akola: बहुप्रतिक्षित 'आरआरआर' चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला;अकोल्यात वसंत टॉकीज प्रदर्शनासाठी सज्ज

The much awaited 'RRR' movie will hit theaters on March 25; Vasant Talkies is ready for release in Akola.( Photo courtesy: RRR movie/ Twitter)





ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'आरआरआर' (RRR Movie) अखेर उद्या 25 मार्च पासून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अकोल्यातील वसंत टॉकीज येथे हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, सिनेमागृहाची संपूर्ण टीम यासाठी सज्ज आहे.  



आरआरआर' सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा डॉल्बी, आयमॅक्स आणि थ्रीडी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट भव्य दिव्य असून, सिनेमात स्पेशल इफेक्ट्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देणार आहे. विशेषतः युवा वर्ग हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.


'आरआरआर' सिनेमात अभिनेता अजय देवगण,ज्यूनियर एनटीआर, राम चरण आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. जवळपास 400 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्देशन बाहुबली आणि बाहुबली 2 चे निर्देशक एसएस राजामौली यांनी केले आहे. 



वसंत टॉकीज येथे 4 खेळ


              Vasant talkies Akola


"अकोला शहरात मध्यवर्ती असलेल्या वसंत टॉकीज येथे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आर आर आर (RRR movie) चित्रपट उद्या शुक्रवार, 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. वसंत टॉकीज येथे दररोज चार खेळ होणार असून, यासाठी ऑनलाईन बुकींग सुरू आहे. तसेच ॲडव्हॅन्स बुकींग सुविधा येथे उपलब्ध आहे."  


श्याम पडगीलवार 

व्यवस्थापक,

वसंत टॉकीज,

अकोला.



टिप्पण्या