ramnavmi 2022-akola-gandhi-road: राम उत्सव समितीच्या वतीने गांधी चौकात साकारणार 'तिरुपती बालाजी तिलक' देखावा

पत्रकार परिषदेत नितीन खंडेलवाल, भरत मिश्रा, रजश्री शर्मा


ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: राम उत्सव समितीच्या वतीने राम नवमी पर्वात  गांधी चौकात 'तिरुपती बालाजी तिलक" चा देखावा साकार करण्यात येणार असून, रामनवमी उत्सवात अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती राम उत्सव समितीचे सर्वसेवाधिकारी भरत मिश्रा यांनी दिली. 



गांधी चौक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यावेळी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, संयोजिका राजश्री शर्मा उपस्थित होते. 



उत्सव दरम्यान गांधी चौक येथे येथे राम दरबार स्थापन करण्यात येणार आहे.  51 हजार हनुमान शक्तीचे वितरण भाविकांना करण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी दररोज महिला मंडळाच्या वतीने आरती करण्यात येणार असून,  रामनवमी दिनी 10 एप्रिल रोजी पंधराशे किलोच्या  महापात्राने महाआरती करण्यात येणार आहे. गणगौर निमित्त महिला मंडळाच्या वतीने मातृ शक्तींना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 



मुख्य सोहळा राम जन्माचा असून 10 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार असून, सायंकाळी गांधी चौकात उत्सवात उपस्थित महिला मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे. या उत्सवास सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 



उत्सवाच्या सफलतेचे साठी आकाश ठाकूर गोविंद शर्मा, रामण्णा गड्डम, अजय गावंडे, विष्णू वर्मा, भाविका मिश्रा, रेवती जोशी सरला शर्मा, आशा मंजुळकर, वैशाली सोनकर,किर्ती नवलकार, ममता शर्मा आदी समवेत कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.





टिप्पण्या