obc-social-rights-conference:शेगाव: ओबीसी समाज अधिकार संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात: ओबीसी समाजाचे हक्क मिळविण्यासाठी एकत्रित या - ज्ञानेश्वर पाटील





शेगाव, दि.26 (प्रतिनिधी) : संत नगरी शेगाव येथे 28 मार्च रोजी होणाऱ्या ओबीसी समाज अधिकार संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय व हक्क यासाठी संमेलनाच्या माध्यमाने संतनगरीत एकत्रित येण्याचे आवाहन खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी केले आहे. 




संमेलनाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



  

राज्यातील ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षणासह त्यांच्या न्याय व ज्वलंत प्रश्न सुटावे, यासाठी ओबीसी संघर्ष समिती राष्ट्रीय ओबीसी महासंघ समता परिषद बारा बलुतेदार महासंघ आदींच्या माध्यमाने संतनगरी शेगावात 28 मार्च रोजी ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 



या संमेलनामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस नेते हार्दिक पटेल, ओबीसीचे नेते तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह अकोला वाशिम बुलढाणा या तीनही जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 25 हजार ओबीसी बांधव या संमेलनाला उपस्थित राहतील, अशी आशा व्यक्त करीत असताना समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्क व मागण्यांसाठी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसींचे नेते तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. 






या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सचिव धनंजय देशमुख, शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण देशमुख, डॉ.जयंत खेडकर आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.




टिप्पण्या