Keliveli_kabaddi_2022_vidarbha: समर्थ अमरावतीचा सीटीपीएस चंद्रपूरवर एकतर्फी विजय; महिला संघाचे साई विदर्भकडे अजिंक्यपद: ये बच्चू कडू का तुफान हैं




ठळक मुद्दा

*मोदी लाट नहीं, ये बच्चू कडू का तुफान हैं उखाडके फेक देगा- ना. कडू





ॲड. नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: समर्थ क्रीडा मंडळ अमरावती संघाने आपल्या प्रतिष्ठेला साजेशी खेळी खेळत विनायक माळी चषक 15 वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पुरुष गटात अजिंक्यपद पटकाविले. तर महिला गटात साई विदर्भ अमरावती संघ अजिंक्य ठरला. रविवारी उशिरारात्री स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने झाला.



एकतर्फी सामने



महिला गटातील अंतिम सामना साई विदर्भ अमरावती व साई काटोल संघात खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात अमरावती संघाने 30-09 असा विजय मिळविला. तिसऱ्या स्थानी साई नागपूर तर चवथे स्थान समर्थ अमरावती संघाने पटकावले.



पुरुष गटातील अंतिम सामना देखील एकतर्फी झाला. समर्थ अमरावती आणि सी टी पी एस चंद्रपूर संघात हा सामना खेळला गेला. मध्यंतर पर्यंत 26-06 अशा गुणांनी समर्थने आघाडी मिळविली होती. सामन्याच्या निर्धारित क्षणा पर्यंत ही आघाडी कायम ठेवून समर्थने 42-12 अश्या गुणांनी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. तृतीय स्थान एकलव्य नागपूर तर चतुर्थ स्थान एस एस धाबेकर कारंजा संघाने पटकावले. 



बलाढय संघांचा सहभाग


या स्पर्धेत विदर्भातील अकरा जिल्हा मधून महिलांचे एकूण 12 तर पुरुषांचे 26 संघ सहभागी झाले होते. विद्युत मोहाडी,जय संतोषी जनेफळ,ओम अमर नागपूर,हनुमान केळीवेळी, प्रशिक्षण अकोला, एस एस धाबेकार कारंजा,सुवर्णयुग अमरावती,गर्जना वर्धा, सी टी पी एस चंद्रपूर,युवा नवरंग अमरावती, हनुमान खामगाव,यंग क्लब अकोला, नगर पुलगाव,सखाराम केळीवेळी, पाखडी बल्लारपूर, एस के एम अमरावती, समर्थ अमरावती, एकलव्य नागपूर, शिवशक्ती प्रतिष्ठान अकोला,नंदकिशोर पुंडा, गाडगेबाबा अमरावती, जगदंबा उमरी, साई स्पोर्ट विदर्भ, मराठा लांसर नागपूर,शिवाजी खामगाव, शिवाजी म्हैसपुर,जय बजरंग हिंगणी, साई काटोल, जय सेवालाल देवठणा, स्टार क्लब अकोला या विदर्भातील बलाढ्य संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ प्रदर्शन केले.


बक्षीस वितरण समारंभ


माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, नामवंत कबड्डीपटू प्यारेलाल पवार दिग्रस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी,आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू विनायक माळी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता संघ व वयक्तीक बक्षीस वितरण करण्यात आले. 


पंचाधिकरी


या स्पर्धेत देवी कामडी,विकास नवघरे, ऋषी कोकाटे,सय्यद मक्सुद,दिनेश चंदेल, तेजसिंह जाधव, राजू आढावू, उमाकांत कवडे, धनंजय बंगाले, महेंद्र ढगे, नरेंद्र उम्रेडकर, राजू तोडेकर, विपीन हटकर, विजय सोलकर, रवी रोहनकर, हितवा बिनीवाले, शुभांगी तुमसरे, शोभा सहारे, संजय खातोकर, रामभाऊ अहिर, अजय पाठे, सिद्धार्थ सोनवणे, रवी राठोड, वासुदेव नेरकर आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली.



येत्या वर्षात क्रीडा संकुलचा कायापालट- ना. कडू


तत्पूर्वी, पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पर्धा स्थळी भेट दिली. आपल्या भाषणात बच्चू कडू यांनी सध्या राज्यात आणि केंद्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करून विरोधकांचे कान पिळले. " मोदी लाट नहीं, ये बच्चू कडू का तुफान हैं उखाडके फेक देगा" असा हिंदी चित्रपट स्टाईल डायलॉग म्हणताच मैदानात टाळ्या शिट्या आणि उत्साही आवाजात तमाम नागरिकांनी प्रतिसाद दिला. 


येत्या वर्षात श्री हनुमान क्रीडा संकुलाचा (केळीवेळी) कायापालट झालेला क्रीडाप्रेमी व गावकऱ्यांना दिसणार आहे.आधुनिक जिम सह सर्व सुविधा येथे निर्माण करण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही याप्रसंगी ना.कडू यांनी दिली.



अन् बच्चू भाऊ उतरले मैदानात


स्वतः कबड्डीपटू असलेले बच्चू भाऊ कडू यांना केळीवेळीत कबड्डीचे एवढे चांगले वातावरण पाहून मैदानात कबड्डीचा एक डाव खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यात लोकांचा आग्रह देखील टाळता आला नाही. शेवटी बच्चू भाऊ मैदानात उतरले आणि एक डाव खेळला.



उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान


स्पर्धेला योग्य प्रसिध्दी व उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल, किशोर बुले, कैलाश ठाकूर, गणेश पोटे,धनंजय मिश्रा, विठ्ल देवकाते, शैलेश खरोटे, मंगेश कराले आदी मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने नीरज भांगे, ॲड.नीलिमा शिंगणे जगड, वर्षा मोरे, सिद्धार्थ वाहुरवाघ, राजेश राठोड, अनुराग अभंग, योगेश सिरसाठ यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.



व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा: बच्चू कडू यांचे भाषण व खेळ कबड्डीचा 

ये बच्चु कडू का तुफान है... बच्चू भाऊ उतरले मैदानात 


                               ......











टिप्पण्या