keliveli-kabaddi-vinayak-mali-cup: अन भाऊच्या वाढदिवसाला हीरोइन गावात... मोनालिसा बागल हिचे केळीवेळीत आगमन






ॲड.नीलिमा शिंगणे- जगड

केळीवेळी (अकोला): 'मला आमदार झाल्या सारखं वाटते' फेम व आगामी मराठी चित्रपट 'तू फक्त हो म्हण' चित्रपट अभिनेत्री मोनालिसा बागल हिने शनिवारी विनायक माळी चषक राज्स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी श्री हनुमान मंडळ क्रीडा संकुल येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या वाढदिवस निम्मित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बिडकर यांच्या वाढदिवस निमित्त मोनालिसा अकोल्यात आली होती. संपूर्ण दिवस मोनालिसाने विवीध ठिकाणी भेट दिली.




मोनालिसा आणि सेल्फी


 

मोनालिसाचे स्वागत गावकरी मंडळीनी मोठ्या जल्लोषात केले. तरुणाईच नव्हे तर बालकांनी देखील मोनालिसाची एक झलक कॅमेराबद्ध करण्यासाठी आपले मोबाईल फोन सज्ज ठेवले होते. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करीत गराडा घातला. मात्र चाहत्यांसाठी मोनालिसाने मंचावरून उपस्थीत सर्वांसोबत सेल्फी काढला. निळसर मोरपंखी काठा पदराच्या साडीत मोनालिसा अधिकच सुंदर दिसत होती. मोनालिसाने यावेळी भाषणात चाहत्यांसोबत संवाद साधला. मोनलीसाच्या हस्ते कबड्डी सामना लावण्यात आला.



क्रीडा विकासासाठी सर्वोतोपरी मदत



यावेळी आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सावरकर यांनी आपल्या भाषणात क्रीडा विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी स्पर्धा आयोजन साठी मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमाचे संचालन अनिल गासे यांनी केले.प्रास्ताविक गजानन दाळू यांनी केले. आभार माधव बकाल यांनी मानले.



रोमहर्षक सामने



स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे सामने रोमहर्षक झाली. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येत आहे. सायंकाळी पुरुषांच्या गटात जय जगदंबा हिंगणी व शिवाजी महाराज मंडळ म्हैसपुर संघात झालेला चुरशीच्या लढतीत 2 गुणांच्या आघाडीने हिंगणी संघाने विजय मिळविला. 39-37असा गुण फलक होता. सायंकाळ पर्यंत पुरुष गटात सहा आणि महिला गटात चार सामने खेळल्या गेली. 






कबड्डी प्रेमींनी केली गर्दी



स्पर्धेतील रोमांचकारी खेळ पाहण्यासाठी मैदानावर अकोला शहर व केळीवेळी परिसरातून कबड्डी प्रेमींनी हजेरी लावली होती. मैदानातील सर्व प्रेक्षक गॅलरी गच्च भरल्या होत्या.



स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी किशोर बुले, कैलास ठाकूर, कमलेश गावंडे, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, डॉ राजकुमार बुले, वासुदेव नेरकर, अनिल फाले, संतोष भोगे, यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि गावकरी प्रयत्न करीत आहेत.



(सर्व छायाचित्र: ॲड. नीलिमा शिंगणे - जगड)

टिप्पण्या