International-Women's-Day-vba: जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे युवती मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम



ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: वर्षभर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पक्षा मध्ये काम करत असताना मोर्चे, आंदोलन, सत्याग्रह, उपोषण ,बैठका, निवेदने सोबतच जिल्हाभर दौरे करून तालुका कार्यकारिणी, सर्कल कार्यकारिणी,बुथकमेट्या स्थापन करणे, आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन करणे तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कुठेही कमी पडू नये या करिता सतत प्रयत्नशील राहणे या सर्व ताण तणाव मधून एक दिवस विरंगुळा मिळावा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून युवती मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 



अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्षा वंदना वासनीक होत्या.उद्घघाटन प्रदेश महासचिव अरुंधती  शिरसाट यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट यांनी प्रास्ताविक केले. पश्चिमच्या महासचिव मंतोष मोहोड यांनी सुत्रसंचलन केले तर पूर्वच्या महासचिव सुवर्णा जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.



     


कार्यक्रमात कथ्थक, लावणी अशी एकापेक्षा एक बहारदार नृत्ये महिलांनी सादर केली.  वेशभूषा व सुरेल गीतांचा सुध्दा नजराणा दिला. नृत्या मध्ये कांचन हिवाळे,कोमल वानखेडे, विपश्यना गोपनारायन यांना क्रमशः तीन बक्षिसे देण्यात आली. गीत गायनकरिता मंदा शेखर, चैताली आठवले, तेलगोटे ताई शिवणी यांना क्रमशः तीन बक्षिसे देण्यात आली. वेशभुषा मध्ये सहा सहभागी युवतींना बक्षिसे देण्यात आली. चार तास हा कार्यक्रम चालला.




जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, जि.प. सदस्या पुष्पा इंगळे, जि.प. सदस्या संगीता अढाउ, जि.प. सदस्या निता गवई, नगरसेवक किरण  बोराखडे, प्रतिभा अवचार यांनी सुध्दा मनोगता मधून शुभेच्छा दिल्या.



    




   

टिप्पण्या