- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
international-women's-day-edu-akl: शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा मुख्यध्यापक संघातर्फे 'कार्य गौरव पुरस्कार' ने सन्मान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या महिला मुख्याध्यापक, शिक्षक व पत्रकार यांचा सत्कार मंगळवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अकोला यांच्या वतीने 'कार्य गौरव पुरस्कार' देवून करण्यात आला. बी आर हायस्कूल येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष विजय कौसल होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, मुख्याध्यापक संघ माजी अध्यक्ष भाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नयना मनतकार, शिक्षण संस्था जिल्हा सचिव ॲड. विलास वखरे, शिक्षक सेनेचे विदर्भ प्रमुख नरेंद्र लखाडे, विजुक्टाचे प्रातांध्यक्ष अविनाश बोर्डे, प्राध्यापक संजय देशमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे विलास अत्रे, डाॕ. विजय टाले, उर्दू टीचर संघटनेचे अध्यक्ष साबीर कमाल, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ कार्याध्यक्ष दिलीप कडू उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ॲड. विलास वखरे शिक्षणाधिकारी डॉ. सौ सुचिता पाटेकर, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष भाऊ शिंदे, सर्जेराव देशमुख, डॉ. टाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कौसल या मान्यवरांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले.
मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक व पत्रकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कार्य गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्ती
शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर, मुख्याध्यापक अलका बोर्डे, उज्वला तायडे ,संगीता पाटील, मंदाकिनी तळोकार, सुनीता गिरे, मीरा आहुजा ,मनीषा अभ्यंकर प्रिया केसवानी, गोसावी ,रेखा ठाकरे माया डिवरे, पत्रकार ॲड नीलिमा शिंगणे- जगड, करुणा भांडारकर, नीलम तिवारी, वर्षा मोरे, शिक्षक जयश्री बोचरे ,शुभांगी चंदन, रिटा परेरा, फराह हुसेन, जयश्री नाईक, रिजवान परविन, कीर्ती देशमुख पानसे, मुस्कान पंजवाणी, डॉ.शिबा तौशिफ,पत्की ,मेघा खानझोडे ,वर्षा भगत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन माया देहनकर यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी केले. आभार मुख्याध्यापक पांडुरंग चोपडे यांनी मानले.
कार्यक्रमाला अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ गजानन चौधरी, दिनकर कडू सचिव, प्रदीप थोरात कार्याध्यक्ष, सर्जेराव देशमुख उपाध्यक्ष, मोहम्मद जाकिर उपाध्यक्ष, बोंडे उपाध्यक्ष, मते ,बाळकृष्ण गावंडे उपाध्यक्ष, नयना मनतकार सहसचिव, सोळंके , चोपडे , श्रीकृष्ण गावंडे , देशमुख , इंगोले, प्रकाश अवताडे, गिरे, डॉ. सतीश चव्हाण,काळे , देशमुख , प्रदीप राजपूत महानगर अध्यक्ष, मुख्याध्यापक सुहास देशपांडे सचिव, नारखेडे उपाध्यक्ष , निलेश खेडकर कार्याध्यक्ष, संदीप वाघ सहसचिव, गोसावी महिला संघटन सचिव, जयेश चोपडे, काळे अध्यक्ष बार्शिटाकळी, सोहेल सचिव बार्शिटाकळी, नानोटे उपाध्यक्ष बार्शिटाकळी, वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा