Holi 2022-celebrated-Falgun-akola: फाल्गुन महिन्याचे गीत गात श्रीरामकृष्ण भक्तांनी साजरी केली पारंपरिक होळी; नैसर्गिक रंग आणि फुलांची झाली उधळण





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: भारतीय संस्कृतीत श्रीराम आणि श्रीकृष्ण वंदनीय व अनुकरणीय असल्यामुळे श्री रामनवमी शोभायात्रा समितीने अकोल्यात राम आणि श्रीकृष्ण भक्तांची एकत्र होळी महोत्सव सुरू केला आहे. यामध्ये परंपरागत पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात येतो. फुल व नैसर्गिक रंगाची उधळण करीत फाल्गुन महिन्याचे गीत गात संगीतमय व पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव आज अकोल्यात साजरा करण्यात आला. 

 


आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात, अकोला पंचक्रोशी मध्ये संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरामध्ये राधा कृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम हरीहर संस्था, श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ, सुप्रभात सत्संग मंडळ यांच्या माध्यमातून अनोखी होळी अकोल्यात सुरू केली. यामध्ये समितीचे अध्यक्ष माजी आमदार गजानन दाळू गुरुजी सह मातृशक्ती, रामभक्त, श्रीकृष्ण भक्त, वल्लभ संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


रामकृष्ण भक्ती दर्शन




राम आणि श्रीकृष्ण भक्तांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला. दरवर्षी या उत्सवाची रामभक्त आणि श्रीकृष्ण भक्त  सतयुग द्वापर युगची महिमा प्रस्तुतीकरण करतात. राज राजेश्वर नगरीमध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येवून लहान मोठ्यांचा भेदभाव न करता एकरूप आणि तल्लीन होवून भजन कीर्तन फुलांची होळी, परंपरागत रंगाने होळी महोत्सव साजरा करतात. आमदार गोवर्धन शर्मा यांनी यावेळी डफ, झाणझन वाजवून तसेच गीत गाऊन उत्सवाचा आनंद घेतला तसेच दाळू गुरुजी यांनी सुद्धा साथ देवून प्राचीन आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवलं. 


भजन प्रस्तुती


समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, सुमन देवी अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी, अमरचंद जोशी, किसन गोपाल पुरोहित, एडवोकेट महेंद्र पुरोहित, किशोर खंडेलवाल, संजय खटोड, हरिओम बजाज, महेंद्र भादुका, जाजू डॉक्टर, गिरीश मंत्री, उमा देवी शर्मा, महादेवराव वानरे यांनी भजन प्रस्तुती केली. 



होळी उत्सवात यांनी घेतला सहभाग




समितीचे अनिल मानधने, गिरीश जोशी, नितीन जोशी, नवीन गुप्ता, रोहित तारकस, पुष्पा वानखडे, रेखा नालट, कल्पना अडचुले, मनीषा अनासने, पद्मा अडचुले, मनीषा भुसारी, सोनल शर्मा, सारिका देशमुख, चित्रा बापट, मुक्ता बापट, मनीषा गावंडे, निशा कढी, सोनल अग्रवाल, सविता शर्मा, मीरा वानखडे, अनिता सोनवणे, डॉक्टर राजेंद्र वानखडे, पवन पाडिया, विमल वानखडे, इंदूताई वानखडे, कल्पनाताई भोंगाळे, शकुंतला वाघमोडे, लीलाताई खेडकर, अमोल मिष्रा, अलका देशमुख, कांचन वानखडे, सुमन अगरवाल, इंदुताई वाकळे,  पल्लवी कांगे, ज्योती लड्डा, पवन पाडिया,विमल पाडीया, सुनंदा गावंडे, जया शुक्ला, सुषमा शुक्ला, गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे, सुलोचना दाडके, शुभम अग्रवाल, प्रतिभा मंडवाले, इंदूबाई थोटांगे, सुनंदा सोरटे, किरण गुप्ता, साधना चंद्रगिरी, जागृती अस्वारे, वैशाली गिरी, गंगा अग्रवाल, जया शुक्ला, सुनंदा गावंडे, ललिता खांडेकर , महानंदा जयस्वाल, मीना जांगिड, रंजना पंडारे, शकुंतला शर्मा, सुशीला अग्रवाल, निर्मला पाडिया, रूपाली जानोरकर, अरुणा जाणकार,  महेंद्र पुरोहीत, पुरुषोत्तम खंडेलवाल, विजय राठी, गिरीश लड्डा, बिंदू सुरेका, लता सुरेखा, शितल गिरी, वैशाली गिरी, साधना येवले, सतीश येवले, सुरेखा बापुरे, चित्रा खेलपांडे, अनिता झाडे, हरिराम बजाज, विनोद बसल,  विलास अनासने, सरिता जोशी, अजय जोशी,  सुनीता जोशी, दिनेश जोशी, चंद्रशेखर खडसे, हेमंत शर्मा सह मोठ्या संख्येने राम भक्त उपस्थित होते.



टिप्पण्या